शहादा तालुका पत्रकार संघाला नाशिक विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर

(न्यूज बेधडक मी मराठी न्यूज)

शहादा: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार नाशिक विभागातून शहादा तालुका मराठी पत्रकार संघाला जाहीर करण्यात आला आहे 1 फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिवंगत अध्यक्ष वसंतराव गाणे यांच्या नावाने आदर्श तालुका पत्रकार संघ व रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने जिल्हा आदर्श पत्रकार संघ पुरस्कार दिले जातात परिषदेच्या वतीने राज्यातून कोकण लातूर पुणे अमरावती संभाजीनगर नाशिक कोल्हापूर व नागपूर या आठ विभागातून प्रत्येक एका तालुका पत्रकार संघाला आदर्श पत्रकार संघ पुरस्कार दिला जातो यावर्षी नाशिक विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघात शहादा तालुका मराठी पत्रकार संघाला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्कारांची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख ,विश्वस्त किरण नाईक ,शरद पाबळे ,अध्यक्ष किरण आष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांनी केली आहे.

शहादा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले सचिव कमलेश पटेल सहसचिव गिरधर मोरे कार्याध्यक्ष अंबालाल पाटील आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने या संघाने पत्रकारांचे हक्क आणि माध्यम स्वातंत्र्याचे हितासाठी काम करताना सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या या संघाने सामाजिक शैक्षणिक आदी उपक्रम देखील राबविले आहेत पत्रकार संघाच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने नाशिक विभागातून शहादा तालुका मराठी पत्रकार संघाची आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून पुरस्कार जाहीर केला असून दिनांक एक फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *