नाशिक : युवराजसिंग राजपूत यांची द जर्नलिस्ट असोसिएशन नाशिक शहर अध्यक्षपदी फेर नियुक्ती करण्यात आली. युवराजसिंग राजपूत यांची समाजसेवेबद्दलची धडपड इतर गरीब गरजू लोकांना शक्य होईल तिथे न्याय मिळवून देण्यासाठी मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेतच. त्याचे सततचे निस्वार्थी कार्य बघता त्यांची फेर निवड द जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश डी यादव, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कोमल कुमावत, नाशिक जिल्हाध्यक्ष अमोल भालेराव व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत युवराजसिंग राजपुत यांची द जनऀलिस्ट असोशिएशन कडुन”नाशिक शहर अध्यक्ष” पदी फेर निवड करून नाशिक शहराची, महाराष्ट्र जबाबदारी देण्यात आली. या कार्यक्रमास द जर्नलिस्ट असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पत्रकार बांधवांनी निवडि बद्दल युवराजसिंग राजपूत यांना शुभेच्छा दिल्या तसेच विविध संघटनांकडुन, समाजसेवकांकडुन,पत्रकार बांधवांकडून शुभेच्छा देत अभिनंदनाचा वषाऀव होत आहे.