धुळे-: नेर येथील जि प शाळा महादेव वस्तील शाळेने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पटकाविला द्वितीय क्रमांक

(बेधड़क मी मराठी न्यूज़ )

धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे : धुळे तालुक्यातील नेर येथील जि प शाळा महादेव वस्तील शाळेने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पटकाविला द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तसेच शिक्षण विभाग पंचायत समिती धुळे, तालुका मुख्याध्यापक संघ धुळे तसेच तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024 चे आयोजन दिनांक 3 व 4 जानेवारी रोजी सहकार महर्षी पि .रा. पाटील हायस्कूल बोरविहीर ता. धुळे येथे आयोजित करण्यात आले होते.

या प्रदर्शनात उच्च प्राथमिक गट (इयत्ता 6 वी ते 8 वी) मधून जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती ता.जि.धुळे या शाळेने हायड्रोपोनिक फार्मिंग या विषयावर साहित्य निर्मिती केली होती. यामध्ये महादेव वस्ती शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला.यावेळी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांचा सत्कार विधान परिषद शिक्षक आमदार श्री डॉ किशोर दराडे तसेच नाशिक बोर्ड विभागीय उपसंचालक श्री सुभाष बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. हायड्रोपोनिक फार्मिंग ही पद्धत आधुनिक शेतीसाठी एक क्रांतिकारक पाऊल असून या पद्धतीचा शेतीमध्ये तसेच शालेय स्तरावर परसबाग मध्ये कसा वापर केला जाऊ शकतो, पाण्याची बचत कशी केली जाऊ शकते, कमीत कमी माती कशी वापरून उच्च प्रतीचे पीक कसे घेता येऊ शकते याबद्दल माहिती शाळेतील विद्यार्थी मिनाक्षी संतोष भदाणे व सेजल निलेश भदाणे यांनी दिली.या साहित्याची पाहणी करत असताना जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरतीताई देवरे, धुळे ग्रामीणचे आमदार श्री राघवेंद्र भदाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे यांनी शालेय पोषण आहारात सदरची पद्धत उपयुक्त असून फायदेशीर असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री विठ्ठल घुगे तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सचिव तथा शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रोहिणी नांद्रे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रत्नप्रभा दंडगव्हाळ, शिक्षण विस्तार अधिकारी श्री एस ओ कोळी , केंद्रप्रमुख जितेंद्र झाल्टे, केंद्रप्रमुख अनिल वानखेडे, केंद्रप्रमुख श्री दिलीप ठाकरे यांनी तसेच मूल्यांकन समितीने देखील या प्रयोगाबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले.शाळेच्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी श्रीमती डॉ किरण कुवर, उपशिक्षणाधिकारी श्री संजीव विभांडीक, केंद्रप्रमुख श्रीमती संगिता दुसाणे, सरपंच सौ गायत्री देवी जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य श्री आनंद पाटील, पंचायत समिती सदस्य श्री मांगू दादा मोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सोनल भदाणे, उपसरपंच श्री दयाराम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री जीवन दादा मोरे, माजी सरपंच श्री शंकरराव खलाणे, सुमनबाई भिल व पालकांनी अभिनंदन केले.

या साहित्य निर्मितीसाठी मुख्याध्यापक श्री विनोद कुवर, मार्गदर्शक श्री रामभाऊ पाटील, विषय शिक्षिका श्रीमती सपना पवार, विषय शिक्षक श्री नानू माळी, श्री अनिल साळुंखे, श्री योगेश कोळी, श्री जगदीश बोरसे तसेच श्री विकास सोनवणे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *