वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळत काथर्दे खुर्द जि.प. शाळेस डायस भेट

( बेधडक मी मराठी न्यूज )

(गोपाल गावित) नंदुरबार : शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा काथर्दे खुर्द येथे दि.०७/०१/२०२५ रोजी आमच्या शाळेतील दानशूर व्यक्तीमत्व असलेले श्री तुकाराम गुंडेराव अलट सर यांच्या मुलाचा चि. अथर्व याचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला डॉ. योगेश सावळे साहेब गटशिक्षणाधिकारी शहादा हे अध्यक्ष म्हणून लाभले या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा श्रीमती संगीताताई पाडवी , माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी.जी. माळी सर , केंद्रीय मुख्याध्यापक श्री. अमृत पाटील सर, श्री. नितीन पाटील सर, श्री. सूरनर सर , सहशिक्षक खेमा वसावे सर, पोलिस पाटील श्री. ईश्वर वळवी, उपसरपंच श्री गणेशभाऊ भील, शिक्षणप्रेमी श्री. गोरखदादा गिरासे, श्री. विष्णू ठाकरे श्री. गणपतभाऊ , अंगणवाडी सेविका सौ. रेखाताई पाटील, गौरीताई वळवी, सहशिक्षिका सौ.हर्षदा पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. भरत पावरा सर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते श्री. तुकाराम अलट सरांनी चि. अथर्वचा सातवा वाढदिवस शाळेत साजरा केला सरांनी अथर्वचे सर्वच वाढदिवस हे शाळेतच साजरा केलेले आहेत व दरवर्षाप्रमाणेच या वर्षीही शाळेला ७५०० रू. किमतीचा डेक्स भेट म्हणून दिला खरच या दानशूर व्यक्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. दर वर्षी शाळेला मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ८ ते १० हजाराच्या वस्तू या भेट म्हणून देत असतात सरांच्या या दातृत्वाला सलाम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी श्री. डाॅ. योगेश सावळे सर यांनीअथर्वच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेला वैचारिक भेट देण्यात आली. या प्रकारचे कृत्य अथर्वची आणि त्यांच्या कुटुंबाची समाजाला परत देण्याची आणि शिक्षणाला पाठिंबा देण्याची वचनबद्धता दर्शवते. या भेटवस्तूमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना आनंद आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकून वाढदिवस साजरा करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. शाळेत सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व भविष्यातही त्यांच्या हातून असेच कार्य होत रहावे अशा शुभेच्छा देत डाॅ. योगेश सावळे साहेबांनी शाळेतील गुणवत्ता विषयी समाधान व्यक्त केले व खेळातही येथील विद्यार्थी पुढे आहेत याचे कौतुक केले. तालुस्तरीय स्पर्धेत जि.प. शाळेतील काथर्दे खुर्द येथील विद्यार्थी चमकले याचे साहेबांनी समाधान व्यक्त केले. व त्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मैदान आखणी तसेच खेळाविषयी मार्गदर्शन केलेल्या श्री नितीन पाटील सर यांचा सन्मान गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. परिवर्धा शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री अमृत पाटील सर यांनी मुलांची क्रीडा स्पर्धेत केलेली कामगिरी तसेच दातृत्वाचे कौतुक केले. सन्मित्र सुरनर सर यांनी विवेक विष्णु ठाकरे आणि सावन गणेश ठाकरे यांनी तालुकास्तरीय खो- खो स्पर्धेत उत्कृष्ट खेळल्याबदद्दल प्रत्येकी २०० रु बक्षीस दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुकाराम अलट सरांनी केले प्रास्ताविक श्री. भरत पावरा सरांनी केले व आभार प्रदर्शन श्री. श्रीकांत वसईकर सरांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *