- बेधड़क मी मराठी न्यूज़
नंदुरबार (गोपाल गावित ) : नवापूर तालुक्यातील जि.प केंद्रशाळा श्रावणी येथे केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला. मा. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचे निर्देशनुसार दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने श्रावणी केंद्रातील प्राथमिक शाळांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केंद्रस्तरावर करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन श्री.गोरखनाथ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.के.कोसे, केंद्रप्रमुख महेंद्र नाईक, मुख्याध्यापक भाऊसाहेब अहिरे, मनोज मराठे, दिपक बोरसे, श्रावणी केंद्र शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र वसावे, सी.के.गावीत, शिक्षिका सीमा पाटील, भारती सोनवणे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, मालिनी वळवी, शिक्षक केशव पवार, ठाकरे सर, अभिषेक कोकणी, मनीषा कोकणी, सुबोध वळवी केंद्रातील सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
मुलामुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेचा गट व विषय खालीलप्रमाणे- स्पर्धेचा गट इयत्ता १ ली ते ४ थी, इयत्ता ५ वी ते ८ वी, इयत्ता ९ वी ते १० वी, स्पर्धेचा विषय प्रजासत्ताक दिन, माझ्या स्वप्नातील भारत, भारतीय इतिहास आणि त्याचा वारसा, केंद्रस्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रातील सर्व शाळांनी सहभागी करण्यात आला. विषयानुरुप चित्र ड्राईंग शिटवर तयार करण्यास सांगण्यात आले होते. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. इ.१ली ते ४ थी गट विषय: प्रजासत्ताक दिन, प्रथम क्रमांक- शिवम छोटू कोकणी जि.प. शाळा वडदे बु॥ ता. नवापूर,द्वितीय क्रमांक- प्रिती कल्पेश भावसार जि.प. केंद्र शाळा श्रावणी, तृतीय क्रमांक- जमुना दिलीप बरटे जि.प केंद्र शाळा, श्रावणी, इ. ५ ते ८ वी विषय : माझ्या स्वप्नातील भारत, प्रथम क्रमांक- विपुल विजयसिंग गावीत आदर्श माध्यमिक विदयालय खडकी ता. नवापूर, द्वितीय क्रमांक- वैष्णवी भाऊसाहेब अहिरे आदर्श माध्यमिक विदयालय खडकी ता.नवापूर, तृतीय क्रमांक- वैभव प्रकाश कोकणी जि.प केंद्र शाळा श्रावणी ता. नवापूर, इ.९वी,१०वी विषय:- भारतीय इतिहास आणि वारसा, प्रथम क्रमांक- कांदबरी सुरुपसिंग वसावे. आदर्श माध्यमिक विद्यालय खडकी ता. नवापूर जि.नंदुरबार, द्वितीय क्रमांक वैष्णवी कनिलाल कोकणी श्री डि अॅण्ड जी माध्यमिक विद्यालय श्रावणी ता.नवापूर जि.नंदुरबार, तृतीय क्रमांक शबनम बालू गावीत “आदर्श माध्यमिक विदयालय खडकी ता. नवापूर जि.नंदुरबार.