-बेधड़क मी मराठी न्यूज़
शहादा : शहादा कलाल महिला मंडळाकडून हळदी कुंकवाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम जल्लोषात व आनंदाने साजरे करण्यात आले. नुकतीच शहादा कलाल महिला मंडळाकडून मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मासिक सभेमध्ये इयत्ता दहावी बारावी वर्गातून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रथमता मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महिला मंडळाच्या मासिक मिटिंग मध्ये दरमहा भिशी काढली जात असते. एकत्रित जमा झालेल्या सर्व महिला भगिनीना महिला कलाल समाज अध्यक्ष सौ वैशाली जावरे व सदस्य हेमांगी जावरे यांच्याकडून हळदीकुंकवानिमित्त भेट देण्यात आल्या. नंतर महिला वर्गात विविध खेळ घेण्यात आले. त्यात फुगे फोड. गाण्यावरून वस्तू ओळखणे असे विविध खेळ घेण्यात येवून महिला भगिनीचा उत्साह वाढविण्यात आला. महिला भगिनींनी कार्यक्रमात अगदी आनंदाने सहभाग नोंदविला. तळोदा येथील सेवा भावे प्रतिष्ठान तर्फे समाजासाठी देण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वैशाली जावरे होत्या. त्यांनी मनोगतात महिला एकत्रीत आल्याने विचारांची देवाण-घेवाण होते शिवाय आलेला थकवा देखील नाहीसा होतो. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची शिखरे अशीच उंच उंच न्यावेत जेणे करून समाजाचे व आपल्या कुटुंबाचे नाव होण्यास मदत होईल. आपला ठसा कायम उमटवावा. कलाल समाज अल्प असून देखील आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याठिकाणी आपली एक वेगळेच ओळख निर्माण करण्यात आपण यशस्वी होतो ही गर्वाची बाब आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हेमांगी जावरे यांनी केले. कार्यक्रमास महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साधकाला समाज मंडळाच्या सर्व पदाधिकारी व महिला भगिनींनी परिश्रम घेतले