-बेधडक मी मराठी न्युज
तळोदा : तळोदा तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थ्यांनी शिवकालीन गड किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी किल्ल्यांच्या तसेच प्रवास वर्णन याबाबत अभ्यास दौरा केला.
या अभ्यास दौऱ्यात दौलताबाद येथील देवगिरी पर्वतावरील 200 मीटर उंच शंकूच्या आकारा च्या टेकडीवर बांधलेला मध्यगण दख्खन मधील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक होता किल्ल्याचा संपूर्ण संकुलाचे क्षेत्रफळ अंदाजे 94.371 आहे आणि ते लष्करी अभियांत्रिकी अद्वितीय जल व्यवस्थापन प्रणालीसह आश्चर्यकारक नगर नियोजन आणि सामर्थ्यशाली राजकीय आणि धार्मिक महत्त्व असलेल्या स्थापत्यशास्त्रीय चमत्काराचे एक अद्वितीय दर्शवणाऱ्या किल्ल्याची विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच हा किल्ला विविध स्थापत्य रचना जसे की पायरी असलेली विहीर तलाव मीनार बारादरी विविध राजवाडे अंधेरी मंदिरे मशिदी , मेंढा तोफ आणि दहा अर्ध निर्मित लेण्यांचे संयोजन आहे. पक्क्या मातीचा पाईपलाईन द्वारे अद्वितीय अशी जल व्यवस्थापन प्रणाली तयार केलेली दिसून येते. तसेच वेरूळ येथील प्राचीन हिंदू व बौद्ध लेण्यांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. बारा ज्योतिर्लिंग पैकी एक घृष्णेश्वर येथे विद्यार्थ्यांनी दर्शन घेऊन प्राचीन मंदिर गाभाऱ्याची पाहणी केली. व रूढी परंपरा जाणून घेतल्या. खुलताबाद येथील भद्रा मारुती दर्शन घेऊन बांधकामाबाबत माहिती करून घेतली छत्रपती संभाजीनगर येथील सुसज्ज छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम येथे भेट दिली. भेटीदरम्यान शिवकालीन अवजारे , अवशेष, नाणी, युद्धरचना, वेगवेगळे प्रकारचे चिलखत, तोफ ,ढाल, जिमखाना शिवकालीन साहित्याची माहिती सविस्तर जाणून घेत मत्स्यालय व प्राणी येथे सदर भेटी देण्यात आल्या .सदर शैक्षणिक सहलीमध्ये 40 विद्यार्थी व सहा शिक्षक सहभागी होते . भेटीसाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत सचिव डॉ.ऋषिका गावित डॉ. विभूती गावित शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील , सतीश पटेल, मंगल पावरा, फिरोजअली सय्यद , अनिल भामरे, सुवर्णा कोळी, संजय पाटील, विनोद राणे, चांदो पाडवी , विजय पवार, निलेश कुवर, सागर पाडवी, यांचे मार्गदर्शन लाभले.