-बेधड़क मी मराठी न्यूज़
शहादा : वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु फातिमा रफीक ईसानी या विद्यार्थिनीचे नंदुरबार या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातुन राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाल्याबद्दल वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
नंदुरबार येथील काने गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातुन वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुमारी फातिमा इसाणी हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला व तिची राज्य स्तरावर निवड झाली. याबद्दल सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे सचिव प्रा संजय जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव, वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय प्रमुख डॉ हिमांशू जाधव यांनी तिच्या स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य एम बी मोरे, उपप्राचार्य जे बी पवार, उपमुख्याध्यापक जे एम पाटील, पर्यवेक्षक खान ए ए, खेडकर ए डी, पालक रफीक इसाणी उपस्थित होते. कुमारी फातिमा ईसानी हिने वेस्ट फ्रॉम बेस्ट या प्रोजेक्टचे सादरीकरण केले होते. कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक शिक्षकांचे, विज्ञान मंच समितीच्या देखील पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रोजेक्टच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मिती, विद्युत निर्मिती, हे प्रात्यक्षिक करून दाखविले होते व परीक्षकांचे तसेच प्रयोग पाहणाऱ्यांचे मन जिंकली होती. कुमारी फातिमाची राज्य स्तरावर निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.