-बेधड़क मी मराठी न्यूज़
शहादा : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२५ नियोजित असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागाने कॉपीमुक्त अभियान अंतर्गत सप्ताहाचे परिपत्रक निर्गमित केले असून शिक्षणाधिकारी स्तरावरून त्याबाबत परिपत्रक प्राप्त झाले आहे त्याअनुषंगाने अंमलबजावणी संदर्भात लाखापूर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात कॉपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाबाबत माहिती करून दिली तसेच परीक्षेला सामोरे जाताना निर्भयपणे आणि आहार काळजीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी वर्गशिक्षक मंगल पावरा यांनी प्रवेशपत्र तसेच उत्तरपत्रिका कशा पद्धतीने सोडवाव्यात याबाबत सखोल मार्गदर्शन केले.कॉपीमुक्त अभियानांतर्गत सप्ताह कालावधीत दिनांक 20 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2025 पर्यंत कॉपीमुक्त अभियान अंतर्गत सप्ताहात स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास समिती सदस्य ,प्रतिष्ठित नागरिक, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक यांच्या संयुक्त सभेचे आयोजन, कॉपीमुक्त अभियानाची शपथ, विद्यालय स्तरावर कॉपी शिक्षा चे वाचन उत्तर पत्रिका मुखपृष्ठाच्या मागील बाजूचे सूचनांचे तसेच प्रवेश पत्रा बाबत माहिती देणे, विद्यार्थ्यांना कॉपी गैरप्रकाराबाबत जाणीव करून देणे, परीक्षेच्या कालावधीत घ्यावयाच्या आहार तसेच काळजी याबाबत उद्बोधनपर चर्चासत्र, परीक्षा संदर्भात तणावमुक्त वातावरण तसेच उत्तर पत्रिका कशी लिहावी याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन, कॉपीमुक्त अभियान जनजागृतीसाठी घोषवाक्य सह शालेय स्तरावर फेरीचे आयोजन, तसेच निर्भयपणे परीक्षेला सामोरे जाणे याबाबत मुख्याध्यापक व ग्रामस्थ यांचे संयुक्त मार्गदर्शन करणे, अशा विविध बाबींवर पूर्ण सप्ताह इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे .