-बेधडक मी मराठी न्यूज
तळोदा प्रतिनिधी- हेमंत मराठे (मो.९६८९८४०८५५)
तळोदा: तालुक्यातील रांझनी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत रांझनी ता. तळोदा येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
तरी ग्रामसभेत आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर सरपंच अजय विजय ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरवात करण्यात आली, सभेत गावातील सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होते तरी ग्रामस्थांना दैनदिन समस्येवर चर्चा करून समस्या सोड़वन्यत आल्या. त्या मधे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या,सांड़पनी व्यवस्था ,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविन्यात आली. तसेच गावातील वाढते अतिक्रमण बघून चिंता व्यक्त करण्यात आली व सर्व ग्रामस्थांना अतिक्रमण मुळे आपल्याला कोणत्या समस्या उदभवत असतात त्याचे महत्व ग्रामसेवक मुकेश कापुरे यानी ग्रामस्थांना सांगितले व ग्रामसेवक यांनी ग्वाही देत ग्रामपंचायत ला सम्पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले. तसेच ग्रामस्थांनी अतिक्रमण स्वतहुन्न काढून ग्रामपंचायतला सहकार्य करावे. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ड यादि मधील मंजूरी झालेल्या घरकुल मंजूर लाभार्थी ची नावे वाचून यादि मंजूर करण्यात येऊन प्रस्ताव शासकीय दरबारी पाठवन्यात आली.ज्यामधे ज्या लाभार्थी ना घरकुल साठी जागा उपलब्ध नसेल त्याना शासन मार्फ़त जागा उपलब्ध करून देयाचा पाठ पुरावा करून जागा उपलब्ध करूँ देऊ असा विश्वास दिला. ग्रामसभेत प्रस्तावना ग्राम विस्तार अधिकारी मुकेश कापुरे यांनी केली.
या वेळी गावचे लोकनियुक्त सरपंच अजय विजय ठाकरे, उपसरपंच शरद मराठे,ग्राम पंचायत सदस्य धनराज कदम,सोन्या पाडवी ,अविनाश पाडवी, तलाठी शशिकला पावरा ग्राम पंचायत सदस्या अश्विनी गोसावी, उषा बाई गावित पोलिस पाटील दिलीप भारती, ग्रामपंचायत ऑपरेटर अभिमन्यु भवर, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर कापसे, प्रवीण कदम,सुधाकर उगले,देवीदास कदम,महेश जगदाले,दिगंबर उगले,माझी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ठाकरे, मनोहर पाडवी सुरेश मोरे, लिम्बा गवली ग्रामपंचायत शिपाई केशव पाडवी, बुधा ठाकरे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता उपसरपंच शरद मराठे यानी केली आलेल्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थां चे आभार मानत समापन केले.