-बेधड़क मी मराठी न्यूज़
धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके
नेर-: साक्री तालुक्यातील दुसाने येथील श्री.प्रविण बागुल हे दिव्यांग असून त्यांना मदतीचा हात म्हणून कु.तनिष्का योगेश कोळी हिचा वाढदिवसानिमित्त व्हीलचेअर भेट देण्यात आली.तसेच नितीनभाऊ कोळी (वाहतूक नियंत्रक, शहादा आगार) यांना प्रविण बागुल हे दिव्यांग असल्याचे दिनेश बागुल यांच्याकडून कळाले.श्री.योगेश सुभाष कोळी (पोलीस नाईक S.D.P.O कार्यालय, शहादा) यांनी त्यांची मुलगी कु.तनिष्का हिचा वाढदिवसानिमित्त दिव्यांग प्रविण बागुल यास व्हीलचेअर देवू केली आणि आज ती सुपूर्द करण्यात आली. या व्हीलचेअरने त्यांच्या शारीरिक अक्षमतेमुळे थांबलेल्या आयुष्याला नक्कीच गती प्राप्त होईल.अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.तसेच व्हीलचेअर सुपूर्द करते वेळी टोकरे कोळी युवा मंच संस्थापक अध्यक्ष नितिनभाऊ कोळी, पियुष कोळी,हर्षल कोळी,राघो बागुल,उमेश पाटील,किशोर बागुल,वैभव बागुल व दिव्यांग प्रविण भाऊ यांचे कुटुंब उपस्थित होते.तसेच श्री.योगेश सुभाष कोळी रा.म्हसावद पोलीस नाईक यांनी क्षणाचाही विलंब न करता व्हीलचेअर उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.