-बेधड़क मी मराठी न्यूज़
धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके
नेर-: धुळे तालुक्यातील नेर येथील यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा एक भाग म्हणून त्यांना व्यवहार ज्ञान देखील अवगत व्हावे. श्रमाचे मूल्य कळावे .यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत धिवरे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सानिका धिवरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब बन्सीलाल पगारे उपाध्यक्ष आशाताई पगारे सचिव स्वातीताई पगारे, शाळेचे प्रिन्सिपल राजेंद्र घोंगडे, व्हाईस प्रिन्सिपल योगेश गातवे, मॅनेजर सुलभा मोरे, व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग उपस्थित होते
सदर आनंद मेळाव्यात 70 स्टॉल होते विद्यार्थ्यांनी वेगळे स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थांचे सादरीकरण केले त्यात , गाजर हलवा ,मिक्स सलाद, पाणीपुरी ,इडली सांबर, शीर खुरमा, झुणका भाकर, आप्पे, ढोकळे, कचोरी, समोसे, पुलाव, भेळ, पोटॅटो प्राईज, खांडवी, केक, बेकरी पदार्थ ,
दाबेली, जिलेबी, पावभाजी, मालपोवा, भेळ, चिवडा, खानदेशी धिंदरे , पुरणपोळी,चहा ,लिंबू शरबत पानाची विडे असे विविध पौष्टिक पदार्थांचे होते.
या सर्व पदार्थांचे प्रमुख पाहुण्यांनी प्रत्यक्ष स्वाद घेऊन परीक्षण केले. आणि आरोग्याला हितकारक अशा पदार्थांना बक्षीस पात्र ठरविण्यात आले, सर्व बक्षीस पात्र सात विद्यार्थी यांना संविधानाची प्रत श्रीमती सानिका देवरे मॅडम यांच्या हस्ते बक्षीस म्हणून देण्यात आले
कार्यक्रमाचे यशस्वीते साठी प्रिन्सिपल राजेंद्र घोंगडे ,वाईस प्रिन्सिपल योगेश गातवे, मॅनेजर सुलभा मोरे ,उपशिक्षिका निलीमा पाटील, दिपाली लिंगायत, दिपाली अहिरे, दिपाली वाघ, तसेच उपशिक्षक जगदीश सोनवणे, नरेश माळी, पंकज चव्हाण, विनायक जाधव, जितेश झाल्टे, गजू वाघ यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती सानिया घिवरे मॅडम यांनी मिलेट या धान्य प्रकाराविषयी माहिती दिली त्यात ज्वारी, बाजरी, नागली, भगर, राळा,हे धान्याचे प्रकार हेल्दी फूड असून त्याचे महत्व पटवून दिले त्यांचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले.