जीवननगर ग्रामसभेत सर्वानुमते दारू बंदी ठराव मंजूर

-बेधडक मी मराठी न्यूज
तळोदा प्रतिनिधि-हेमंत मराठे (मो.९६८९८४०८५५)

तळोदा :– तालुक्यातील जीवननगर येथे दारूबंदी सह सर्व प्रकारच्या मादक द्रव्यांवर व प्रतिबंधात्मक कायदे असलेल्या बाबींवर बंदी आणण्याचा ग्रामसभेचा सर्वानुमते ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत जीवननगर येथे सरपंच मोगीताई अमरसिंग पावरा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने दारू प्राशनमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे त्यामुळे गावात दारू विक्री व निर्मिती करण्यासाठी बंदीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. असून यामध्ये गावातील 21 व्यक्तींची दारूबंदी तसेच मादक द्रव्य प्रतिबंध समिती स्थापन करण्यात आली असून याद्वारे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला कळवून गावकऱ्यांचे ग्रामसभा घेऊन यामध्ये दारूबंदी निश्चित करण्यात येणार आहे. दारू सह सर्व प्रकारचे अंमली पदार्थ खरेदी विक्री करणे व वापर करण्यासाठी बंधने घालण्यात आली आहेत. आदिवासी रूढी परंपरा जपण्यासाठी दारूचा वापर विविध आयोजन व कार्यक्रमांच्या दिवशीच योग्य प्रमाणात करण्यावर एक मत करण्यात आलेले आहे. ग्रामसभेद्वारे घनकचरा व्यवस्थापन ,आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, उपजीविका, पाणीपुरवठा, बालविवाह प्रतिबंधक कायदा ,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत विकास आराखडा, प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी, वैयक्तिक व सामूहिक विकास कामे या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीचे सरपंच मोगीताई अमरसिंग पावरा, उपसरपंच भरत कुबजी वसावे,ग्रामपंचायत अधिकारी मुकेश कापुरे ,ग्रामपंचायत ऑपरेटर अभिमन्यु भवर यांचे सह
बाज्या डेडया वसावे, कालूसिंग गुलाबसिंग वसावे,दशरथ बन्या तड़वी,जाम्या अट्या तड़वी,रमेश कट्या पावरा, मोहन पावरा, कुशल वसावे,विकास पावरा, रमेश गुजार्या पावरा,दिलीप पावरा,सुखराम पावरा,रमेश कुब्जी वसावे,गुलाबसिंग नमशी वसावे,ज़िरया पाडवी भील,मगन कोलज्या वसावे,डेबा बारकया पावरा,सुभाष रेवजी वसावे,कृष्णा वेस्ता पावरा
ग्रामपंचायत सदस्य सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *