बेधडक मी मराठी न्यूज
- शहादा:- शेत जमिनीचे मोजणी केलेले शीट शेतकऱ्यास देण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक अभिजीत वळवी यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले याबाबत शहादा पोलीस ठाण्यात लाचखोर अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकरी यांच्या मालकीची शहादा तालुक्यातील हिंगणी शिवारात गट नंबर 17 या क्षेत्रात शेतजमीन आहे या शेतजमिनीची शहादा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी करण्यासाठी अर्ज दिला होता त्या अर्जानुसार भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक अभिजीत अर्जुन वळवी शेत जमिनीची मोजणी केली मोजणी केलेल्या शेत जमिनीची शीट मागण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने वळवी यांच्याकडे वारंवार मागणी केली असता शीट देण्याच्या बदल्यात वळवी यांनी संबंधित शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने लाच लुचपात प्रतिबंधक कार्यालय नंदुरबार येथे तक्रार दाखल केली शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दि. 6 रोजी शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा लावला असता भूकर मापक अभिजीत वळवी संबंधित शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना रंगेहात मिळाला या घटनेमुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच धावपळ उडाली आरोपी वळवी यास ताब्यात घेऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहादा पोलीस ठाण्यात आणून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती ही कारवाई नंदुरबार येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार हेमंत महाले ,संदीप खंडारे, देवराम गावित, देवराम गावित, विजय ठाकरे, जितेंद्र महाले, नरेंद्र पाटील, सुभाष पावरा यांच्या पथकाने केली.