– बेधडक मी मराठी न्यूज (धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे)
- धुळे:- साक्री तालुक्यातील वसमार येथील गावातील शिवारात भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना साक्री तालुक्यातील वसमार येथे गुरुवारी रात्री घडली. गुरुवारी दिवसभर प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. दरम्यान, वसमार परिसरात बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
वसमार येथील हिंदड्या शिवारात शेतकरी राजेंद्र गिरधर नेरे , यांच्या शेतात रात्रीची लाईट असल्याने रात्री पिकांना पाणी देत होते परंतु सकाळी मोटर बंद करण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या पडल्याचे आढळले. ही माहिती वन विभागाला दिली, त्यांनी वन विभाग बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. ४० फूट खोल असलेल्या विहिरीत पाणी असल्याने जीव वाचवण्यासाठी बिबट्याने कपाऱ्यात बसून राहिला, ग्रामस्थांनी तत्परता दाखवून विहिरीत खाट सोडला परंतु खाटेवर बसला नाही पिंपळनेर येथून पिंजरा मागवण्यात आला पिंजराच्या साह्याने बिबट्याला बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पिंपळनेर वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गीते , म्हसदी वनपाल दिपाली अहिरे,संदीप मंडलिक, अमोल भदाणे,रामदास चौरे, म्हसदी वनरक्षक नितेश गावित, पांडुरंग जलेवाड, देविदास सोनवणे,योगेश सातपुते, अमोल पवार, अनिल घरटे, आकाश पावरा, रंजना पावरा, सुमित कुवर, म्हसदी वनरक्षक वन कर्मचारी नितीन भदाणे, भटू बेडसे, एकनाथ गायकवाड, पंडित खैरनार, वसंत खैरनार, आदी वनकर्मचारी यांचा समावेश असलेले पथक दाखल झाले, त्यानंतर पाहणी करून पिंजरा मागवण्यात आला; पण पिंजरा येण्यासाठी तब्बल चार तास प्रतीक्षा करावी लागली. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. वारंवार प्रयत्न करूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्याने बिबट्याला बाहेर कसे काढावे असा प्रश्न पथकाला पडला होता.
अखेर तीन तास प्रयत्न केल्यानंतर बिबट्या पिंजऱ्यात बसला व उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वन विभागाच्या पथकाला लोकनियुक्त सरपंच समाधान येळीस ,पोलीस पाटील मधुकर नेरे, राजेंद्र नेरे, रतिलाल नेरे, वसंत नेरे, नंदकुमार नेरे, विकास देवरे, युवराज नेरे, तेजस नेरे ,गणेश येळीस,सुनील आजगे,यांनी मदत केली. तसेच पिंजऱ्यासाठी चार तासांची प्रतीक्षा वसमार येथे भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने दोन वर्षाचा बिबट्या विहिरीत पडला होता. वन विभाग, आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले; पण वन विभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल चार तासांनंतर पिंजरा आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती पिंपळनेर वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गीते, यांनी दिली.म्हसदी परिसरात रात्रीचा वीज पुरवठा होत असल्यामुळे
पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकरी रात्री आपरात्री शेतात येत असतात मात्र बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी भयभीत होतात. वनविभागाने योग्य ते दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच शेतकरी मी रात्री पिकांना पाणी देत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हिंस प्राणी लकडबघा व बिबट्या कांदा पिकामध्ये प्रचंड अशी धुमाकूळ सुरू होती लकडबघाच्या पाटलागाने बिबट्या हा जीव वाचवण्यासाठी निंबाच्या झाडावर चढला मी टॉर्च मारून पाहिला असता त्याचे डोळे चमकले त्यानंतर खाली उतरल्याने पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याचा अंदाज आला
युवा शेतकरी तेजस नेरे यांनी सांगितले होते.
चार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश