बेधड़क मी मराठी न्यूज़ (तळोदा प्रतिनिधी- हेमंत मराठे मो.नं-9689840855)
- तळोदा: तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणावर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
एसएससी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेशित होत असतात. परंतु व्यावसायिक शिक्षणातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते परिणामी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन आर्थिक परिस्थिती वर मात करता येते.
त्या अनुषंगाने बोरद येथील व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील केंद्रसंचालक टिल्लू पावरा व गौतम पावरा यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाबद्दल एक महिना मोफत उपक्रम उपलब्ध करून देत संधी उपलब्ध करून दिली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भामरे तर आभार प्रदर्शन मंगल पवार यांनी मानले.
व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील , संजय पाटील, विनोद राणे, सतीश पटेल, मंगल पावरा , चंदू पाडवी, फिरोजअली सय्यद, सुवर्णा कोळी, निलेश कुवर आदींनी परिश्रम घेतले.