शहादा :- पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने “रोल ऑफ अनालिटीकल सायंटिस्ट फॉर कॉम्प्लेक्स मोलेक्युल इन फार्मा आर अँड डी” या विषयावर सेमिनारचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे करण्यात आले होते. या सेमिनारसाठी प्रमुख अतिथी म्हणून सिनियर अनालिटीकल सायंटिस्ट, वक्ते श्री दिलीप पाटील, महाविद्यालाचे प्राचार्य डॉ एस.पी.पवार, वरीष्ठ महाविद्यालयाचे केमिस्ट्री विभागाचे डॉ मिलिंद पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून सेमिनारची सुरुवात झाली. यावेळी वक्ते श्री दिलीप पाटील यांनी सांगितले की, फार्मास्युटिकल संशोधन आणि विकासामध्ये जटिल अणुंच्या विश्लेषणात्मक वैज्ञानिकांचा महत्त्वपूर्ण रोल असतो. या वैज्ञानिकांचा मुख्य कार्य म्हणजे नवीन औषधांमध्ये असलेल्या जटिल रासायनिक संरचनांचा अभ्यास आणि त्यांचे सुसंगत विश्लेषण करणे. यामुळे औषधाच्या गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित केली जात आहे. विश्लेषणात्मक वैज्ञानिकांच्या मदतीने, विविध अणूंच्या रचना, गुणधर्म, आणि त्यांच्या प्रतिक्रियांची सखोल तपासणी केली जाते. हे संशोधन औषधनिर्माण प्रक्रियेत मदत करते, जसे की, अणूंच्या शुद्धतेचा आणि त्यातील हानिकारक घटकांचा शोध घेणे. याचबरोबर, औषधाच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असलेल्या विविध रासायनिक पदार्थांची सुसंगतता आणि स्थिरता देखील तपासली जाते. जटिल औषधांच्या निर्मितीमध्ये विश्लेषणात्मक वैज्ञानिकांचा योगदान महत्वाचा आहे कारण ते औषधाच्या प्रारंभिक संशोधनापासून ते बाजारात उपलब्ध होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यावश्यक गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करतात. या कार्यामुळे, रुग्णांना अधिक सुरक्षित आणि प्रभावी औषधे उपलब्ध होतात, जे आरोग्य क्षेत्रातील प्रगतीला चालना देतात. त्यानंतर वक्ते दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सदर घटकावर मार्गदर्शन करून विद्यार्थांचा प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. सदर सेमिनारमध्ये 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या सेमिनारसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या सेमिनारचे सूत्रसंचालन व आभार प्रा.अमित धनकानी यांनी केले. सदर सेमिनारच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.