कोठार आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजनाचा अनोखा सोहळा संपन्न

  • बेधडक मी मराठी न्यूज (तळोदा तालुका प्रतिनिधी -हेमंत मराठे) मो न 9689840855
  • तळोदा : तालुक्यातील कोठार येथील अनुदानित आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व मातृ-पितृ पूजनाच्या अनोखा समारंभ पार पडला. या सोहळ्यात विद्यार्थी,शिक्षक व पालकांचे डोळे पाणावले.
    श्री.साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक (कोठार ता. तळोदा) दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ मातृ-पितृ पूजन समारंभ आयोजित केला जातो. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी बी.आर. मुगळे,माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, बळीराम पाडवी, कैलास चौधरी,भाजपा तालुका अध्यक्ष,प्रकाश ठाकरे, शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, संस्थेचे संचालक काशीराम पाटील,निसार मक्राणी,गुलाबराव चव्हाण,माजी पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा,डॉ.किशोर पाटील,दिनेश खंडेलवाल, दारासिंग वसावे, संजय वाणी,नारायण ठाकरे, योगेश मराठी,सुनील चव्हाण,आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
    सुरुवातीला आमदार राजेश पाडवी यांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर मातृ-पितृ पूजन समारंभात १० वीच्या विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे औक्षण करून त्यांना नमस्कार केला.या भावनिक कार्यक्रमात आपल्याकडून केला जाणारा आदर पाहून आई-वडिलांचे डोळे पानावले.या कार्यक्रमात सुमारे 50 पालकांची विद्यार्थ्यांनी आरती, क्षण करून त्यांना साष्टांग नमस्कार केला.
    याप्रसंगी बोलताना आमदार पाडवी यांनी हा निरोप समारंभ नव्हे तर पुढील जीवनाचा प्रारंभीला शुभेच्छा द्यायच्या कार्यक्रम आहे. आश्रमशाळा हे संस्कार घडवण्याचे ठिकाण असून अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संस्कारीत केले जाते ही आनंदाची बाब आहे. शाळेतील संस्काराची शिदोरी भविष्यातील अविस्मरणीय आठवण ठरत असल्याचे ते म्हणाले.अध्यक्ष भाषणात डॉ.शशिकांत वाणी यांनी शाळेत पुस्तके शिक्षण देण्याबरोबर विद्यार्थ्यांना मूल्यांचे शिक्षण देण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार रुजवणे ही काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी संस्थेची वाटचाल विशिद केली.
    या प्रसंगी निसार मक्राणी,जितेंद्र सूर्यवंशी,दाज्या पावरा,दारासिंग वसावे, कैलास चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक जयवंत मराठे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार हंसराज महाले यांनी केले.
  • फोटो : कोठार ता.तळोदा अनंत ज्ञानदीप आश्रमशाळेत आयोजित मातृ-पितृ पूजन समारंभात आई-वडिलांचे पूजन करताना विद्यार्थी सोबत आमदार राजेश पाडवी,डॉ. शशिकांत वाणी,अजय परदेशी,बळीराम पाडवी, गौरव वाणी,जितेंद्र सूर्यवंशी,काशीराम पाटील,निसार मक्राणी,गुलाबराव चव्हाण,दाज्या पावरा, कैलास चौधरी आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *