– बेधड़क मी मराठी न्यूज़
- शहादा : खेळ हा मानवी जीवनाच्या अविभाज्य अंग आहे. विविध मैदानी खेळ खेळल्याने शरीराच्या सर्वांगीण व्यायाम होतो. विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये गुंतून न राहता मैदानी खेळ खेळून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मैदानी स्पर्धा गरजेच्या असल्याचे प्रतिपादन प्राचार्या सुरेखा पाटील यांनी केले.
- शहरातील शेठ.व्ही.के.शहा. विद्यालयात शाळांतर्गत वनश्री भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विविध स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचचा प्राचार्या सौ सुरेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक सुरेश जाधव, पर्यवेक्षक विपिन चौधरी, ज्येष्ठ शिक्षक विष्णू जोंधळे , क्रीडा शिक्षक दिपक निकुंभ आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे, संगीत खुर्ची, गोणपाट उडी,स्लो सायकलिंग,लिंबू चमचा,दोरी उडी,खो-खो, बॅडमिंटन अशा विविध स्पर्धांच्या समावेश होता.यात विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी नितीन चौधरी,भरत पाटील,जे.आर. चौधरी,कमलेश पाटील, शशिकांत पाटील,शिवाजी गांगुर्डे,युवराज पाटील, विजयसिंग ठाकूर,दिनेश पाटील,नितीन साळुंखे,तुषार पाटील,शरद पाटील,निखिल पाटील,संदीप रावताळे,मच्छिंद्र पाटील,शरद पाटील,मीनाक्षी पाटील,उज्वला गुजर,सुलक्षणा पाटील,दिपाली देवरे,शितल नावडे,जयश्री पाटील,मोगी मुकरंदे,रेखा पाटील,रंजना पाटील,सुनंदा निकम,सविता पाटील,हर्षा पाटील,तक्षशिला ठाकरे,अर्चना चौधरी,इंदिरा नाईक,मनिषा पाटील,मंजुषा खंडीकर,वंदना चौधरी,रोहिणी झणझणे,हंसा पाटील,पुष्पलता पाटील,वंदना पाटील,पुनम गोसावी,भावना पाटील,दिपाली दाभाडे , सुभाष कोळी, भीमराव बिऱ्हाडे आदींनी सहकार्य केले.