शहादा : येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ समस्त चर्मकार समाजाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
संत शिरोमणी गुरु रविदास जयंतीनिमित्त समाजातील ज्येष्ठ समाज बांधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून जयंती सादर करण्यात आली.यावेळी समाजातील जेष्ठ नागरिक जगन्नाथ अहिरे, गबा अहिरे, भीमराव चव्हाण, चिंधु अहिरे, दामू अहिरे, पितांबर चव्हाण, पुरुषोत्तम अहिरे, नरेंद्र बागले, योगेश सावंत ,सुरेश चव्हाण, योगेश अहिरे, भारत अहिरे, दिनेश अहिरे, विजय अहिरे, विश्ववेश अहिरे ,सुनील अहिरे ,सागर सोलंकी ,तुकाराम अहिरे, अहिरे ईशांत, अहिरे गौरव ,अहिरे अभय ,अहिरे पांडू, अहिरे रोहित, अहिरे बादल ,अहिरे चेतन आधी उपस्थित होते अभिवादनानंतर सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पावेतो समस्त चर्मकार समाज बांधवांच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सवाद्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत समाजातील सर्व बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.