बेधडक मी मराठी न्यूज (तळोदा प्रतिनिधी -हेमंत मराठे मोबाईल नंबर 9689840855) तळोदा : गुरुवार रोजी आय जी फ्रेंड सर्कल सोशल ग्रुप तळोदा यांच्यामार्फत नेहमी समाजसेवेचे कार्य अविरत चालू असते .या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर गोसावी हे नेहमी गोरगरीब जनतेचे नेहमी सहकार्य करीत असतात .त्याच अनुषंगाने या सोशल ग्रुपच्या वतीने मा. तहसीलदार तळोदा यांना निवेदन देऊन तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील नागरिकांच्या सोयीसाठी तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघातील तसेच अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या सोयीसाठी शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दोन पैकी एक सत्र न्यायालय व एक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ची न्यायालय तळोदा तालुका तळोदा येथे चालू होणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. त्यामुळे दुर्लक्षित व गरीब गरजू नागरिकांना न्याय मिळवणे सोयीचे व सुलभ होऊ शकते.
सद्यस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील एकूण दोन ठिकाणी नंदुरबार व शहादा येथे सत्र न्यायालय कार्यरत आहेत. नंदुरबार येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायालयात नंदुरबार व नवापूर या दोन तालुक्यांतर्गत असलेली प्रकरणे चालवली जातात. उर्वरित शहादा धळगाव तळोदा व अक्कलकुवा या चार तालुक्यांची प्रकरणे शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात चालवली जातात. तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात बहुतांश नागरिक हे डोंगरी भागातील आदिवासी अशिक्षित व दुर्लभ आर्थिक गटातील नागरिक आहेत त्यामुळे त्यांना सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर च्या खटल्यांचे कामकाजासाठी शहादा येथे लांब अंतरावरून येजा करावी लागते. मुळातच या परिसरात दळणवळणाची साधने दुर्मिळ व अपूर्ण असल्यामुळे पक्षकार व त्यांचे माहितगार वक़िलाना शहादा येथे दैनंदिन कामासाठी ये जा करणे अत्यंत जिकरीचे व त्रासाचे होते.
अशा परिस्थितीत शहादा येथील दोन सत्र न्यायाधीशांपैकी एक तीन पैकी एक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पैकी एक अशा दोन न्यायाधीशांच्या आस्थापना तळोदा येथे वर्ग करून अथवा प्रतिनियुक्ती तत्त्वावर किमान महिन्यातून पंधरा दिवसांसाठी नेमणूक झाली तरी तळोदा व अक्कलकुवा येथील जनतेस सोयीचे होईल.तरी सदरची मागणी बाबत आपल्या स्तरावरून गरजू व दुर्लक्षित पक्षकारांच्या हितासाठी प्राधान्याने पूर्णत्वाचे आदेश व्हावेत अशा मागणीचे निवेदन आय. जी. फ्रेंड सर्कल सोशल ग्रुप तळोदा यांच्या वतीने महाशय तहसीलदार तळोदा यांना देण्यात आले आहे व सदरची प्रत ही मा.जिल्हाधिकारी सो नंदुरबार व महाशय मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राज्य यांना देखील मागणीची प्रत रवाना करण्यात आलेली आहे. तरी निवेदनावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर गोसावी तसेच ग्रुपचे प्रमुख सदस्य मुकेश पाळवी ,पंकज ठाकरे, ऋषी पाडवी ,कुशल चौधरी, लकी चौधरी, हितांशू कलाल अमीर अन्सारी ,रोशन नाईक आधी प्रमुख सदस्यांच्या सह्या होत्या.