विविध मागण्यांसाठी तळोदा तहसील कार्यालयावर लाल बावटाचा धडक मोर्चा

बेधडक मी मराठी न्यूज

तळोदा तालुका प्रतिनिधी-हेमंत मराठे मो. 9689840855

  • तळोदा : तळोदा येथे शेतमजुरी युनियन तालुका कमिटीच्या वतीने शेतमजुरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय तळोदा येथे घोषणाबाजी करत असंख्य शेतमजुरांचा धडक मोर्चा काढण्यात आला .महाराष्ट्र राज्य शेतमजुरी युनियन लालबावटा धुळे जिल्हा कमिटी ने जिल्ह्यातील चारही तालुक्यात शेतमजुरांच्या प्रमुख मागण्या घेऊन तहसील व प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला .त्याच्याच एक भाग म्हणून काल दिनांक 14 रोजी तालुका कमिटी तळोदा च्या वतीने मोर्च्याच्या आयोजन करण्यात आले. यावेळी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात भाषणाद्वारे गोरगरीब शेतकरी व मजूर वर्ग यांच्या समस्यांच्या पाढा मांडत सरकारवर कळाळून टीका केली. त्यानंतर तहसीलदार सो तळोदा यांना विविध मागण्यांची निवेदन देण्यात आले .त्यात प्रामुख्याने वन हक्क कायद्याप्रमाणे प्रलंबित असलेले वन दावे तात्काळ मंजुरी करीत सातबारे अदा करणे, व एका कुटुंबास कायद्यान्वये दहा एकर शेत जमिनीचे वाटप करणे शहादा व तळोदा तालुक्यातील गायरान व पडीक जमिनी 1991 च्या कायद्याप्रमाणे तसेच 2011 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे लाभार्थ्यांची नावे करा १९९६ च्या ३६ व ३६ अ तसेच 1978 च्या कायद्यानुसार बिगर आदिवासींनी हस्तांतरित केलेल्या जमिनी मूड मालकाच्या ताब्यात देणे ,तसेच घरकुल योजनेचे अनुदान केरळ राज्य प्रमाणे सात लाख रुपये करून पहिला हप्ता एक लाख रुपये देण्यात यावा ,ग्रामीण भागात मनरेगाचे कामे ग्रामपंचायत मार्फत सुरू करावे ,तसेच बेरोजगार भत्ता रोजगार न दिल्यास लागु करावा. त्याचप्रमाणे संजय गांधी इंदिरा गांधी श्रावण बाळ या योजनांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषा अन्वये अडीच लाख रुपये अशा उत्पन्नाच्या दाखल्याची सवलत देऊन 3000 रुपये पेन्शन द्यावे. बोगस आदिवासींचे जात प्रमाणपत्र रद्द करून अशा लोकांवर तात्काळ गुन्हा नोंद करणे ,खते बी बियाणे यांच्या किमती नियांत्रित करून शेतिमालला हमीभाव द्यावा. वरिष्ठ व समाजकार्य पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेच्या शिफारस न देणाऱ्या तळोदा येथील वरिष्ठ व समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शिफारस देण्याचे तात्काळ आदेश द्यावेत .तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांचे सदस्यत्व रद्द करून तशी शिफारस तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात यावी .अशा प्रमुख मागणीचे निवेदन तहसीलदार सो तळोदा यांना देण्यात आले आहे. निवेदनावर लालबावटा युनियनचे कॉ. सुनील गायकवाड कॉ. अनिल ठाकरे ,कॉ दयानंद चव्हाण , रुबाबसिंग ठाकरे काँ सुभाष ठाकरे, काँ कैलास चव्हाण ,कॉ मंगल सिंग चव्हाण, कॉ तापीबाई माळी, काँ तुळशीराम ठाकरे ,काँ अनिल शिरसाट, कॉ इंदिराबाई चव्हाण, कॉ रमण पवार ,कॉ धर्मराज ठाकरे ,कॉ विकास ठाकरे, प्रदीप मोरे आदी मान्यवरांच्या सह्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *