बेधडक मी मराठी न्यूज
तळोदा तालुका प्रतिनिधि – हेमंत मराठे मो नो ९६८९८४०८५५
- तळोदा: तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची काही दिवसातच एसएससी बोर्ड परीक्षा प्रारंभ होत असून त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी विद्यालयातच निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी गुरुजनांचा सत्कार सन्मान करीत प्रतिमा पूजन करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक योगेश पाटील होते. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शिक्षकांचे अध्यापन विषयी माहिती दिली. कृतज्ञता व्यक्त होत भावनांना वाट करून दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. शिक्षक देखील भावुक होत आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्ष भाषणात मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतर विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित व्हायचे असते. वेगवेगळे संधी उपलब्ध होतात त्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन इयत्ता दहावीचे विद्यार्थिनी हसीना रवींद्र ठाकरे, नंदनी दिलीप नाईक यांनी केले तर आभार अर्जुन बाबू नाईक या विद्यार्थ्यांनी मानले. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अल्पोहार देण्यात आला.