बेधडक मी मराठी न्यूज
- शहादा : ग्रामविकास संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय बामखेडे त.त. ता शहादा येथील प्राचार्य प्रो एच एम पाटील यांची क.ब.चौ.उ.म.वि. जळगांव च्या प्राचार्य गटातुन रिक्त झालेल्या जागी सिनेट सदस्य म्हणुन नियुक्ती झाली आहे.
प्रा पाटील हे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे सदस्य आहेत. या अगोदर विद्यापीठाच्या आदिवासी अकादमी नंदुरबारचे सदस्य तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार सदस्य म्हणुन कार्य केले आहे . महाराष्ट्र शासन अंगिकृत महाराष्ट्र अध्यापक प्रबोधिनी अकॅडेमी पुणे यांचेशी कला महाविद्यालय बामखेडे यांनी पार्टनरशीप करार केला आहे. महाराष्ट्रातील मोजक्या बारा प्रतिष्ठीत संस्थांनी या प्रबोधिनीशी करार केला आहे.यात ग्रामिण भागात असलेल्या बामखेडा महाविद्यालयाचाही समावेश आहे. प्राचार्य डाॅ एच एम पाटील हे MSFDA या संस्थेचे नंदुरबार जिल्ह्यातुन अंबेसेडर म्हणुन निवडले गेले आहेत.
याच माध्यमातुन आयआयटी च्या टीमने नुकतीच अनुभवजन्य शिक्षणातली कार्यशाळा घेतली यात नंदुरबार व धुळे जिल्ह्यातुन एकुण सात महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. या माध्यमातुन परिसरातील समस्या ,विविध सामाजिक,आर्थीक व शास्र विषयक प्रश्नांची सकारात्मक उकल करण्याचा प्रयत्न होत आहे. अक्राणी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई वर विद्यार्थी व पालकांच्या माध्यमातुन उपाय शोधण्यासाठी जलसाक्षरता समिती मार्फत केलेले कार्य तसेच नमामि सातपुडा मिशन ही सातपुड्याला शाश्वत अभिवादन करणारी चळवळ सुरु करणारे डाॅ पाटील हे रचनात्मक व सकारात्मक कार्य करण्यासाठी ओळखले जातात.
पाटील यांच्या नियुक्ती बद्दल कुलगुरु प्रो डाॅ व्ही एल माहेश्वरी प्रकुलगुरु एस टी इंगळे,कुलसचिव डाॅ विनोद पाटील संस्थेचे अध्यक्ष पी बी पटेल सचीव बी व्ही चौधरी,उपाध्यक्ष डाॅ के एच चौधरी, एनमुक्ता संघटनेचे अध्यक्ष डाॅ नितीन बारी, माजी प्राचार्य डाॅ एस पी पाटील,आदिंनी अभिनंदन केले आहे.