बेधडक मी मराठी न्यूज तळोदा (तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे) मो. नंबर 9689840855
- उपशिक्षक अनिल भामरे यांनी छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतून आठवणींना उजाळा दिला..
- तळोदा: तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उपशिक्षक अनिल भामरे यांनी “होय मी राजे शिवाजी शहाजी भोसले बोलतोय” शिवरायांच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना पात्र सादर करून स्वराज्य संकल्पना तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी भूमिकेतून अनमोल माहिती करून दिली. याप्रसंगी विद्यार्थी राजे शिवरायांचे पात्र बघून अवाक झाले होते. तसेच उपशिक्षक फिरोजअली सय्यद यांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक तसेच रयतेचे राजे या विषयावर माहिती करून दिली . उपशिक्षक विनोद राणे यांनी शिवकालीन किल्ले, शिवरायांचे बालपण, बारा बलुतेदार, शिवरायांची ऐतिहासिक संग्रहालय तसेच गड आला पण सिंह गेला याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विनोद राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी “जय भवानी जय शिवाजी”
जय घोष करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.