बेधडक मी मराठी न्यूज
धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे
- धुळे-: ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अतर्गत धुळे जिल्ह्यातील ९३ हजार ४८ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचे वितरण तसेच ५० हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्त्या वितरण सोहळा आज उत्साहात पडला. तसेच गोरगरीब,गरजू आणि बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत महाराष्ट्रासाठी दुसऱ्या टप्प्यात २० लाख नवीन घरे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे.आज पुणे येथे भारत सरकारचे कणखर गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह साहेब यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हा निधी वितरित करण्यात आला. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण धुळे जिल्हा परिषद येथे करण्यात आले, जिथे अनेक लाभार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमादरम्यान लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करून त्यांना हक्काच्या घराचा आनंद मिळवून देण्याचा सोहळा पार पडला. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नांतून “सबका साथ, सबका विकास” या संकल्पनेला बळ मिळत आहे. प्रत्येक गरजू कुटुंबाला स्वतःचे घर मिळावे, यासाठी हे पाऊल निश्चितच महत्वपूर्ण आहे.या प्रसंगी मा.केंद्रीय मंत्री डॉ.सुभाषजी भामरे,आमदार राम दादा भदाने,मा.जि.प.अध्यक्ष सौ.धरतीताई देवरे,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विशालजी नरवाडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गणेशजी मोरे व भाजप जिल्हाउपाध्यक्ष प्रा.अरविंदजी जाधव आदीमान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.