बेधडक मी मराठी न्यूज
तळोदा तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे
मो.नो 9689840855
तळोदा: तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपशिक्षक संजय पाटील होते. उपशिक्षक अनिल भामरे यांनी बोलीभाषा व मराठी राजभाषा याविषयी तुलनात्मक मार्गदर्शन केले. तसेच उपशिक्षक फिरोजअली सय्यद यांनी मराठी राज भाषेचे महत्व तसेच शासकीय कार्यालयामध्ये व व्यवहारात उपयोगात येणारी मराठी राजभाषा विषयी अनमोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात उपशिक्षक संजय पाटील यांनी कुसुमाग्रज तसेच मराठी राजभाषेच्या इतिहास याविषयी माहिती सांगितली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक फिरोजअली सय्यद यांनी केले तसेच आभार चांदो पाडवी यांनी मानले.