बेधडक मी मराठी न्यूज
तळोदा तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो.नो 9689840855
तळोदा: तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पदी रांजणी येथील मंडाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच अखिल भारतीय दशनाम गोस्वामी समाज अध्यक्ष अमोल प्रल्हाद भारती यांची तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मा. आमदार राजेश दादा पाडवी तळोदा शहादा मतदार संघ यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने रुजू झालेले एआर गावित साहेब निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्वाचित कार्यकारणीची घोषणा केली. त्याच्यात सभापती राजेश दादा पाडवी , उपसभापती अमोल प्रल्हाद भारती, संचालक म्हणून नीरज पाटील, तळवे सुरेश आण्णा इंद्रजीत, प्रतापूर गौतम शेठ जैन तळोदा, निखिल भाई तुरखिया तळोदा, कल्पेश माळी, तळोदा पिंटू गाडे तळोदा, लताबाई फोके तळोदा,रेखाबाई माळी, तळोदा रघुवीर चौधरी, तळोदा सचिव सुभाष मराठे अशी पदे जाहीर केले.त्यावेळी तळोदा शहादा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश दादा पाडवी यांनी अमोल प्रल्हाद भारती उपसभापती यांना पुष्पगुच्छ शाल ,श्रीफल व पेढा भरवत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पदभार स्वीकारल्यानंतर मा. अमोल भारती यांनी जमलेल्या शेतकरी वर्गाला संबोधित करताना म्हटले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दर्जा अधिकाधिक कसा उंचावेल त्याचप्रमाणे शेतीमालाला योग्य प्रतीच्या भाव देण्याची आम्ही देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.त्याचप्रमाणे आमदार साहेबांनी शेतकऱ्यांना संबोधित करीत म्हटले की शेतकऱ्यांनी बाहेरगावी बाजारपेठेत शेतीमालाला जो बाजार भाव मिळतो. तोच बाजार भाव तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती त देखील भेटत असतो. म्हणून वाहतुकीच्या अनावश्यक खर्च टाळून इतरत्र शेतीमाल विक्री करण्यापेक्षा आपल्या बाजारपेठेत शेतीमाल विक्री करावा.अशी विनंती केली. त्यावेळेस ज्येष्ठ नेते खरवड येथील श्री नंदू गिर गोसावी, संदीप गोसावी, रांजणी चे लोक नियुक्त सरपंच अजय विजय ठाकरे बाजार समितीचे कर्मचारी संजय कलाल ,प्रसाद बैकर तसेच व्यापारी वर्ग व मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता.