बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो न 9689840855
तळोदा : येथील अ. शि. मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्व. प्राचार्य भाईसाहेब गो. हू. महाजन सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इंक्युबेशन अँड लिंकेजेस’ आणि तळोदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “एकदिवसीय नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. एस. आर. गोसावी हे अध्यक्ष होते तर प्रमुख अतिथी म्हणुन श्री. सागर पाटील (CEO, KCIIL, Jalgaon) हे लाभले होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉक्टर स्वप्निल वाणी यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. डॉ. मुकेश जावरे यांनी करून दिला. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात श्री. सागर पाटील यांनी इन्वेंशन आणि इनोव्हेशन यातील फरक विद्यार्थ्यांना समजावला. वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून व पद्धतींच्या माध्यमातून इनोव्हेशन कसे निर्माण होते किंवा कसे करता येऊ शकते हे समजावले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात त्यांनी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इंक्युबेशन अँड लिंकेजेस’ या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःचा नवीन स्टार्टअप, उद्योग किंवा व्यवसाय कसा उभारता येऊ शकतो व त्यासाठी विद्यापीठ कशा पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देते आणि वेळोवेळी मदत करते, हे समजावले. कार्यशाळेत एकूण 90 विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. जे. एन. शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत दलाल, प्रा. डॉ. संजय शर्मा, प्रा. डॉ. राजेंद्र मोरे, प्रा. डॉ. हेमकांत सावंत, प्रा. बन्सीलाल भामरे, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश्वर पंजराळे, श्री. मनीष कलाल, श्री. पी. एल. पाटील इत्यादींचे सहकार्य लाभले.