बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे मो न 9689840855
तळोदा – तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन (भूषा,भरड, उंबरपाटा गावठाण) येथे होळी दिनांक 15 मार्च 2025 रोजी रात्री आठ वाजता सुरू होऊन सकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहे. होळीनिमित्त येणाऱ्या सर्व समाज बांधवांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात गळ्यातील ढोल प्रथम बक्षीस 7551 रुपये,द्वितीय बक्षीस 5551 रुपये, तृतीय बक्षीस 3551 रुपये, खुर्चीवाले ढोल प्रथम बक्षीस 5551रुपये, द्वितीय 3551 रुपये,तृतीय बक्षीस 2251 रुपये,बावा बुद्या स्पर्धा प्रथम बक्षीस बाजार 5551रुपये,,द्वितीय बक्षीस देणार 3551रुपये, तृतीय बक्षिस 2551रुपये,गेर नृत्य प्रथम बक्षीस 5551 रुपये,द्वितीय बक्षीस 3551रुपये,तृतीय बक्षीस 2551 रुपये,होळीगीत गायन प्रथम बक्षीस 3101रुपये,, द्वितीय बक्षीस 2101रुपये,तृतीय बक्षीस 1101 रुपये देण्यात येणार असून 40 किलोमीटर पेक्षा जास्त अंतराने आलेल्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर वाढीव रकमेचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच स्पर्धेत येताना रात्री 9 ते 11 दरम्यान नाव नोंदणी करणे आवश्यक असून येताना पथकवादक प्रमुखांनी सोबत आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. तसेच होळी उत्सवात दारू व जुगार बंदी असून आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे गाव उत्सव समितीकडून सांगण्यात आले आहे.