बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी–हेमंत मराठे
मो.9689840855
तळोदा : जिल्हा परिषद मराठी शाळा पाडळपूर येथे ग्रामपंचायत पेसा निधी अंतर्गत 97 विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमात गावाचे सरपंच देवीलाल ठाकरे ग्रामसेवक महेश पाटील व पेसा अध्यक्ष ज्योतिबाई ठाकरे यांच्या संयुक्त संकल्पनेतून गावातील जिल्हा परिषद शाळेत 97 विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस देण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने आज दिनांक 21/03/2025 रोजी प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष सरपंच देवीलाल ठाकरे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक महेश पाटील यांनी केले .प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गिरधर मोरे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शकीलाताई वडवी अंगणवाडी सेविका, चिंतामण वलवी, मुख्याध्यापक जामुनपाडा, शाळेचे उपशिक्षक प्रवीण वसावे, नंदकुमार शेंद्रे व कुमारी राजनंदनी वडवी सर्व शिक्षक रुंद यांच्या उपस्थितीत स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले. शेवटी कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांचे आभार शाळेचे मुख्याध्यापिका सीमा बागुल यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांनी मोलाचे परिश्रम घेतले.