बेधडक मी मराठी न्यूज
शहादा : पौर्णिमा व हनुमानजी जन्मोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी जमली होती. शहरातील श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे, पौर्णिमा व हनुमानजी जन्मोत्सवाच्या निमित्त हनुमान चालीसा पठण महाआरती व महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होत. अशी माहिती मंदिराचे विश्वस्त राजेंद्र भटुलाल अग्रवाल यांनी दिले. या कार्यक्रमांमुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
शहादा शहरातील श्री महावीर हनुमान मंदिर,( बस स्थानक समोर) खोलगल्ली मधील पुरातन हनुमान मंदिर, प्रेस मारुती मंदिर, उंटावद येथील हनुमान मंदिर, तसेच गोमाई नदीकाठावरील हनुमान मंदिर यांसह अनेक लहान-मोठ्या हनुमान मंदिरांची विशेष सजावट करण्यात आली होती. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. हनुमानजी जन्मोत्सवाने ही सर्व मंदिरे भक्तांनी गजबजली होती.