बेधडक मी मराठी न्यूज
तळोदा तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
तळोदा: तालुक्यातील रांजणी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राजनी गावालगत असलेल्या गाव शिव वरती बसलेल्या हनुमान मंदिरावर हनुमान जयंती निमित्त भाविकांची गर्दी होत असते.या पवित्र दिवशी मंदिराचे पुजारी प्रकाश महाराज ठाकरे हे पहाटेपासूनच राम जप करीत असतात व रात्रभर भजनाचा जागरण कार्यक्रम असतो. प्रामुख्याने मंदिराची ख्याती अशी आहे की हे मंदिर गावाच्या सीमेरेषेवर पूर्वीपासून स्थिर आहे. तेथे फक्त हनुमानाची मूर्ती उघड्यावर पडून होती. परंतु पुजारी यांनी एके दिवशी ह्या मूर्ती जवळ जाऊन संकल्प केला की मंदिराच्या जीर्णोद्धार करून घ्यायचे ठरवले.त्यांनी आपल्या भजनी मंडळाला सांगून कल्पना मांडली व मागील पाच ते सहा वर्षांपासून मंदिराच्या जीर्णोद्धार करून मंदिरावर गावकऱ्यांकडून यथोचित दान धर्म करून भंडार्याचे आयोजन करण्यात येते. गावातून मंदिराचे सेवेकरी विजय मक्कन ठाकरे ,संतोष ठाकरे ,अंबालाल पाडवी, सतीश नाना गोसावी, वासुदेव पाडवी नरेंद्र गायकवाड व गावातून बरेच भाविक कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत असतात. कार्यक्रम योग्यरीत्या हाताळून गावाचे सरपंच अजय विजय ठाकरे व उपसरपंच शरद मराठे हे आपले कामकाज सोडून पूर्ण दिवस या भंडारा व महाप्रसाद प्रत्येक भक्तांना पोटभर भेटावा याची विचारपूस करून घेताना दिसतात. भंडाऱ्यासाठी ज्यांना दानधर्म करायचे असेल त्यांनी स्वखुशी दान धर्म देतात. विशेषतः कोणाकडूनही जबरदस्ती देणगी मागत नाही.