बेधडक मी मराठी न्यूज
शहादा : शहरातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा शहादा दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर अचानक आगीचे लोट दिसू लागल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी सदर घटना नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कळविल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ ठरला या व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कचऱ्याच्या ढगाला अज्ञात व्यक्तीने आग लावली त्यानंतर ही आग पसरत गेल्याने दुकानदारांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र अग्निशामक दलाने वेळेतच आग विजयाने मोठा अनर्थ टळला आहे.
या घटनेत कचऱ्याच्या ढिगार्याला आग लागल्याने आग पसरत गेली होती. तिसऱ्या मजल्यावरील काही भाग जळून खाक झाला असताना, दुकानदारांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहादा पालिकेच्या अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले आणि व्यापारी संकुलाला जास्त नुकसान होण्यापासून रोखले.