शहादा तालुकाकाँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ताची आढावा बैठक संपन्न!

बेधडक मी मराठी न्यूज

  • पूर्ण वेळ जिल्हाध्यक्ष देण्याची कार्यकर्त्यांकडून एकमुखी मागणी…..

शहादा – जिल्ह्यात काँग्रेस मजबूत असल्याचे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले असतानाही पक्षाकडे काही वर्षापासून पूर्ण वेळ जिल्हाध्यक्ष नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली त्यामुळे तळागाळातील निष्ठावान कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पक्षाला आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सक्रिय व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करणारा जिल्हाध्यक्षाची नेमणूक लवकर करावी अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांसमोर म्हसावद येथे झालेल्या तालुकास्तरीय काँग्रेसच्या आढावा बैठकीत केली.
म्हसावद येथे पक्ष निरीक्षक एडवोकेट संदीप पाटील यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषअण्णा पाटील ,ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक , युवका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकी पाटील, एड. अशोक पाटील ओरसिंग पटले, माजी नगरसेवक रियाज कुरेशी देवा चौधरी ,सत्यन वळवी आदी प्रमुख उपस्थित होते
पक्षनिरीक्षक एड. संदीप पाटील म्हणाले इंदिराजिना साथ देणाऱ्या या जिल्ह्यात लवकरच कार्यकर्त्यांना उभारी देणारा आणि पक्षाला नव्या उंचीवर नेणारा कार्यक्षम जिल्हाध्यक्ष दिला जाईल लोकसभेला यश मिळाले मात्र विधानसभेला अपयश मिळाले तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही सकारात्मक असले पाहिजे कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडणुका लढविल्या जातात पण त्यासाठी नेत्यांकडून निवडणुकीचे नियोजन करणे महत्त्वाचे असते “वन बूथ- टेन युथ” ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पक्षाने आग्रही भूमिका घेतली आहे राजकारणात चढ उतार येत असले तरी कार्यकर्ते एकसंघ ठेवणे ही प्रत्येक नेत्याची जबाबदारी आहे सर्वसामान्य कार्यकर्ता पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर गेला पाहिजे यासाठी तळागाळात काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच तिकीट देण्याची भूमिका पक्षाने घेतली असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले
जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष अण्णा पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती चांगली असली तरी कार्यकर्त्यांना वरिष्ठ पातळीवरून ताकद देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले
ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित व सुहास नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले
प्रास्ताविक डॉ. सुरेश नाईक यांनी केले सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *