बेधडक मी मराठी न्यूज
शहादा : मा.जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ. मिताली सेठी, मा.अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, मा.सहाय्यक जिल्हाधिकारी, शहादा डॉ.कृष्णकांत कानवारिया, मा.तहसीलदार शहादा श्री.दिपक गिरासे, यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 24/04/2025 रोजी मौजे अनरद येथील दादासाहेब रावल एज्युकेशन संचलित हाय स्कूल येथे शिबिर आयोजित करण्यात आले. यात महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग इ. मार्फतचे विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच त्यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे मार्गदर्शन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री.पुरवठा निरीक्षण अधिकारी, श्री. अमोल पाटणकर रावसाहेब,मंडळ अधिकारी श्री.रविंद्र गवळी, विस्तार अधिकारी माळी रावसाहेब, मुख्याध्यापक श्री. कोमलसिंग गिरासे, कृषी पर्य वेक्षक तसेच अनरद, शिरुडदिगर, पुसनद व लगतच्या गावातील सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते. शिबिर अनरद येथील दादासाहेब रावल एज्युकेशन संचालित हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले. यात शालेय विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे दाखले, नागरिकांचे रेशन कार्ड, शेतकऱ्यांचे ॲग्री स्टॅक प्रमाणपत्र, जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत वारसांचे सातबारे, विशेष सहाय योजनेअंतर्गत विधवा, दिव्यांग, वृद्धापकाळ लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड,जातीचे दाखले,उत्पन्न दाखले,जन्म दाखला, जॉब कार्ड चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात ग्राम महसूल अधिकारी जे. पी. अहिरे, व मंडळ अधिकारी रविंद्र गवळी यांनी या शिबीराबाबत तसेच विविध योजनांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मोहिदे तश मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.शिबिराचे सूत्र संचलन व आभार श्री. जे. पी. अहिरे ग्राम महसूल अधिकारी यांनी केले.