बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो न.9689840855
- तळोदा: गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या सीमारेषेवर गेल्या तीस वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या पुलाच्या कामाची सुरुवात मागील वर्षी झाली. त्यामुळे पिसावर व खेडले दरम्यान येणारा कोठवा नाल्यावरील पूलाचे बांधकाम तीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झाले आहे. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील अनेक गावांतील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
पुलाचे काम करण्यासाठी गुजरात सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यात ८.४०X११ मीटर अंतराचे गाळे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे उंची व लांबी चांगल्याप्रकारे असल्याने बांधकाम चांगले झाले आहे. परंतु पिसावर हून खेडले गावाकडे जातांना पुलानंतर मोठे वळण देण्यात आलेले आहे. त्याठिकाणी दिशादर्शन फलक लावणे गरजेचे आहे. कारण रात्रीच्या वेळी चालकाला रस्ता अस्पष्ट दिसून आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक किंवा लाईट रिफ्लेक्टर लावण्याची मागणी होत आहे. तसेच पुलापासून ते खेडले गावापर्यंतच्या रस्त्याचे काम वर्ष 2021 मध्ये करण्यात आलेले आहे. त्यावर खड्डे पडले असून साईट पट्टयांवर मुरूम, रेती, खडी न टाकता मातीचा भराव टाकण्यात आला आहे. पावसाळ्यात चारचाकी वाहतूक करणे जिकरीचे होते. त्यामुळे हा रस्ता नव्याने व्हावा अशी ग्रामस्थ व प्रवाशांची अपेक्षा आहे. - वीस पेक्षा जास्त गावांना होणार पुलाचा फायदा
पूल झाल्यामुळे दोन्ही राज्याच्या ग्रामीण भागातील गावे मोड, बोरद, खेडले, मोहीदा, कढेल तऱ्हावद पुनर्वसन, खरवड, छोटा धनपूर, मोड पुनर्वसन ई. महाराष्ट्रातील गावे तसेच गुजरात मधील पिसावर, उबट, सदगव्हाण येथील परीसरातील नागरीक व नातेवाईक मंडळींना प्रकाशा, शहादा तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये जाणे सोईचे होईल. त्यामुळे वीस पेक्षा जास्त गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच मोड, मोहिदा इ. परिसरातील नागरिक रोजगारासाठी सुरत, नवसारी, उधना येथे जात असतात त्यामुळे पिसावर येथे नियमीत गुजरात बस येत असते त्यामुळे रोजगारासाठी जाणाऱ्या नागरिकांना बारमाही सोयीचे झाले आहे.