बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो नं 9689840855
रांझणी: तळोदा तालुक्यातील रांझणी,चिनोदा,प्रतापपुरसह परिसरात यावर्षीही खरीप हंगामात मिरची पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाणार असल्याचे चित्र असून हे पीकाची रोपे जर सुदृढ आणि निरोगी असतील तर मिरची पीक सुदृढ निरोगी राहून उत्पादन चांगले येते हे लक्षात घेत शेतकरी रोपवाटिकातील मिरची रोप लागवडीस प्राधान्य देत असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणावर रोपवाटिकांमध्ये मिरची रोपांची बुकिंग झाली आहे.
दरम्यान परिसरातील रोपवाटिकांमध्ये रोपे बनवण्याची प्रक्रिया सुरू असून या ठिकाणी ट्रेमध्ये कोकोपीठ टाकून मिरची बी लागवड करून त्यास झारीद्वारे पाणी देण्यात येत असून ही रोपे 25 ते 30 दिवसात तयार होणार असून रोप लागवड झाल्यानंतर 45 ते 50 दिवसात मिरचीस फळधारणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मिरची रोपे साधारणता एक रुपये पन्नास पैसे तर एक रुपये सत्तर पैसे प्रतिरोध या दराने विक्री होणार असल्याचे रोपवाटिका मालकांकडून सांगण्यात येत आहे.
रोपवाटिकांमध्ये रोपे लागवड सुरू असल्याने परिसरातील मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत असून सकाळच्या वेळी रोपे तयार करण्यास गती देण्यात येत असल्याबाबत चित्र आहे.
” यावर्षीही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मिरची रोप बुकिंग करण्यात आले असून साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात मिरची लागवड मोठ्या प्रमाणात होईल असा अंदाज असून शेतकऱ्यांकडून आपापल्या शेतीची मशागत करण्यात येत आहेत. सध्या अजूनही बुकिंग येत असून बुकिंगव्यतिरिक्तही रोपे तयार करण्यात येत आहेत.”
दिपक मराठे (नर्मदा रोपवाटिका रांझणी)