बेधडक मी मराठी न्यूज-
तळोदा तालुकाप्रतिनिधी हेमंत मराठे
मो न 9689840855
तळोदा : कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर विठ्ठल भोकरे व मंडळाचे सचिव ह.भ.प.सुनील वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कानादेश वारकरी रत्न, कानादेश वारकरी भूषण व ज्येष्ठ वारकरी भूषण पुरस्कार वितरण सोहळा दि.२५ मे २०२५ रोजी धुळे येथे संपन्न झाला.
कान्हदेश वारकरी सेवा मंडळ धुळे यांच्या वतीने सन २०२४-२५ या वर्षातील ज्येष्ठ वारकरी पुरस्कार प्रधान सोहळ्यात तळोदा तालुक्यातील व गुजरात मधील कुकरमुंडा तालुक्यातील गावांच्या वारकऱ्यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात तळोदा येथील शंकर मुठाळ, चिनोदा येथील नारायण कृष्णा पाटील, तळवे येथील अशोक रमण पाटील, धानोरा येथील मोहन हरी पाटील, बोरद येथील दत्तूभाई रोहिदास पाटील, सदगव्हाण येथील नगिन गोपाल पाटील, बालदा येथील राजेंद्र दत्तात्रय चौधरी, बहुरूपा येथील डॉ.कांतीलाल दत्तात्रय पटेल, कुकरमुंडा येथील एकनाथभाई पटेल यांना जेष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील लाखो वारकरी मोठ्या संख्येने हजर होते ह्या वर्षाचा वारकरी रत्न पुरस्कार ह.भ.प.डॉ.भगवान महाराज आनंदगडकर जालना यांना देण्यात आला. प्रसंगी खानदेश वारकरी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व नामांकित कीर्तनकार मंडळी, धुळे येथील आमदार अनुपभैय्या अग्रवाल, भाजपा अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तुषारजी भोसले, महंत प्रणव गिरी बाबाजी नागाई संस्थान साक्री, गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर. ह.भ.प.उद्धवजी महाराज कुकरमुंडेकर, ह.भ.प.सुशील महाराज विटनेरकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वारकरींना प्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली.