बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो.9689840855
तळोदा – तालुक्यातील चिनोदा येथे दोन दिवसांपूर्वी अति साराची लागण होऊन सुमारे ५० नागरिकांना जुलाब,उलट्या, ताप आदि त्रास जाणवत होता.बाधित रुग्णांना तळोदा उपजिल्हा रुग्णालय व गावातील मंगल कार्यालय तसेच काही जणांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले.यात एका वीस वर्षीय मुलीची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यातआले आहे. दरम्यान अतिसार नियंत्रणासाठी आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून साथरोग नियंत्रणात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या जुलाबाचे ६ तर अतिसाराचा १ रुग्ण असल्याची माहीती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील धानका गल्लीतील जलवाहिनीला गळती लागल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी या परिसरातील ५० नागरिकांना जुलाब, उलट्या,ताप यांचा त्रास जाणवू लागला होता. स्थानिक रहिवाशांनी या संदर्भात आरोग्य विभागाला माहिती दिल्यानंतर साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल होऊन उपचार सुरू करण्यात आले. परिस्थिती नियंत्रनात आणण्यासाठी पथकाने स्थानिकांच्या मदतीने गावातील मंगल कार्यालयातच अतिसार बाधित रुग्णावर प्राथमिक उपचार सुरू केले तर काही रुग्णांना तळोदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच काही रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डायरिया बाधितांमध्ये एका वीस वर्षे वयाच्या मुलीची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास येताचं तिला व एका अन्य रुग्णस तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.सध्या त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीयसूत्रांकडून सांगन्यात येत आहे.दरम्यान गेल्या दोन दिवसापासून आरोग्य विभागाचे पथक गावात ठाण मांडून बसले असून बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य पथकात वेद्यकीय अधिकारी डॉ.योसेब गावित तसेच डॉ दिनेश रावताळे यांच्या निरीक्षणाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ कृष्णा पावरा, डॉ सुमित वाणी, डॉ हर्षल पाटील, डॉ अभिषेक मराठे, आरोग्य सेवक सचिन मतकर किरण वळवी, शशिकांत पावरा, सतीश जाधव आरोग्यसेविका वैशाली गरुड, चंदन पाडवी, लक्ष्मी वसावे, गीता पाडवी आशा गटप्रवर्तक संध्या साळवे, चेतना वसावे सुमन पावरा कविता पाडवी, आशा उषा ठाकरे अरुणा ठाकरे तारा ठाकरे, कोकिळा वर्ती आरती पाडवी, अंगणवाडी सेविका शीतल मराठे, मोगरा ठाकरे रंजिता ठाकरे, संगीता सोनवणेआदिं कर्मचाऱ्यांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. नागरिकांना साथरोग संदर्भात काळजी घेण्याविषयी सूचना दिल्या जात आहेत.दरम्यान ग्रामपंचायत ने दोन दिवस पाणीपुरवठा बंद करून नळगळती झालेल्या ठिकाणी दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांची गावाला भेट
आज अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमितकुमार पाटील यांनी चिंनोदा गावाच्या अतिसाराच्या पार्श्वभूमीवर गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.तळोदा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी काशिनाथ पवार उपस्थित होते.साथरोग संदर्भात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.
प्राथमिक आरोग्यकेंद्र प्रतापपूर अंतर्गत चिनोदा येथे अतिसार नियंत्रणासाठी पथक कार्यरत करण्यात आले आहे. त्याद्वारे कसोशीने प्रयत्न सुरू असून साथरोग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आज दि.१५ रोजी जुलाबाचे सहा व अतिसाराचे एक असे एकूण सात रुग्ण असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून काळजी घेण्याविषयी नागरिकांना सूचना देण्यात आले आहेत त्यांचे पालन नागरिकांनी करावे.
डॉ.योसेब गावित
वैधकीय अधिकारी,
प्रा.आ.केंद्र प्रतापपुर