बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो.9689840855
अनिष्ट रूढी-परंपरांवर कठोर निर्णय ; विवाह खर्चावरून महिलांनी मांडली परखड मते
तळोदा – मराठा समाजातील वाढत्या अवाजवी खर्चावर रोष व्यक्त करत, समाज परिवर्तनासाठी महिलांनी पुढाकार घेतल्या असून याबाबत रविवारी प्रकाशा येथे महिला मेळावा आयोजित करून महिलांना मार्गदर्शन केले.. मराठा समाज परिवर्तन चळवळ, महिला परिवर्तन चळवळ, युवा परिवर्तन चळवळ आणि मराठा समाज प्रबोधन मंडळ, जिल्हा नंदुरबार यांच्या संयु
क्त विद्यमाने आयोजित मेळावा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनाने
झाली. या वेळी अन्नपूर्णा मराठे, ताराताई मराठे (अध्यक्ष, महिला परिवर्तन चळवळ, नंदुरबार), उषाताई पवार (उपाध्यक्ष), सविता कदम (मुख्य समन्वयक), कल्पनाताई जगदाळे (समन्वयक), हेमलता रावडे (उपाध्यक्ष, नंदुरबार तालुका), गायत्री बोराणे, संध्या पाचोरे, संगीता पाचोरे, भारती कदम, रत्ना काळे, वर्षा पवार, सीमा मोघल, ज्योती कदम, दीपाली बोराणे, राजेश्री कटारे आणि शेळके आदिजान व्यासपीठावर यांची उपस्थिती होती.
मेळाव्यात विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्र पार पडले. स्त्री शिक्षणावर बोलताना ज्योती कदम यांनी महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. दीपाली बोराणे यांनी लग्नसमारंभातील गोंधळ, मेहंदी यांसारख्या खर्चिक बाबींवर टीका करत, गरीब कुटुंबांची होणारी आर्थिक वाताहत मांडली.
राजेश्री कटारे यांनी मुलींनी नोकरीच्या पलीकडे जाऊन शेती व व्यवसाय क्षेत्रात सक्रिय भूमिका घ्यावी, असे मत मांडले. घटस्फोटाचे वाढते प्रमाण आणि त्यामागची कारणे समजावून सांगताना शेळके यांनी संवाद, सहिष्णुता आणि समजुतीचे महत्त्व अधोरेखित केले.
महिला जिल्हाध्यक्षा ताराताई मराठे यांनी विवाह समारंभांतील प्रि-वेडिंग साँग, मेहंदी, गोंधळ या परंपरांवर परखड भाष्य करत, लग्नात आलेल्या पाहुण्यांना वर-वधूचे आधीच सोशल मीडियावर फोटो बघून मत ठरवावे लागते, ही अत्यंत चुकीची पद्धत आहे, असे सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, “वडील राब राब राबून पैसा कमावतात आणि मुलांच्या लग्नात कर्जबाजारी होतात. अनेकवेळा आत्महत्येपर्यंत मजल जाते. ही गंभीर समस्या आहे.त्यामुळे आताच आपण महिलांनी पुढाकार घ्यावा,असे सांगितले. महिला जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मराठे यांनी आपल्या आजी, आई या अशिक्षित असतांनाही त्यांनी दिलेल्या चांगल्या संस्कारांमुळे आम्ही तसेच पुढील पिढी घडली असल्याचे सांगत वडिलांनी काबाडकष्ट करत आम्हा बहिणीचे जीवन सुखी जावे म्हणून मेहनत घेत असल्याचे सांगत जीवनातील फक्त शेवटचे चार वर्षे स्वतःच्या घरात घालवले असल्याच्या आठवणीना उजाळा दिला त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.त्यांनी आपल्या आईबाबांची कायम जाण ठेवा असे सांगितले.
महिलांनी शेती, व्यवसाय, समाजकार्य या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे.अनिष्ट परंपरांमुळे शेती वाढण्याऐवजी वाटून जात आहे, असे सांगत महिलांनी पुढाकार घ्यावा,आणि खर्चिक रूढींना फाटा द्यावा अशी भावना प्रा.भगवान चिने यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक धनराज पाचोरे यांनी केले. सूत्रसंचालन सारिका मराठे यांनी तर आभार आयोजक विठ्ठल मराठे यांनी मानले. विठ्ठल मराठे यांनी मनोगतातून “स्वतःला बदला, समाज घडेल” हा संदेश उपस्थितांना दिला. या मेळाव्याद्वारे महिलांनी सामाजिक बदलाची नांदी केली असून, रूढी-परंपरांना आव्हान देणाऱ्या विचारांना बळकटी दिली गेल.
लग्नपत्रिका सोशल मीडियावर वाटप करणे.
लग्नात मेहंदी कार्यक्रम बंद करणे.
साखरपुडा प्रथा बंद करणे.
मरण आजारपण यात देवाणघेवाण बंद करणे.
मुली बघणे कार्यक्रमात कमीत कमी संख्येने येणे.
पंगतीत मर्यादित पदार्थ ठेवणे.
हुंडा पद्धत बंद करणे.
लग्न वेळेवर लावणे.
वराला आई व बहिणीकडून ओवाळणी टाकावी.पारावर नाश्ता पद्धत बंद करावी.
बग्गी आणू नये.
लग्न मंडपात चप्पल घालू नये.
वैदिक पद्धतीने लग्न लावू नये.
लग्नात ओटी भरणे बंद करावे.
लग्नात सोने कमीत कमी देणे. घटस्फोट दोन्ही कुटुंबांकडून समजदारीने घेण्यात यावा.
प्रमाण घ्यावा घटस्फोटातील देण्याची रक्कम मर्यादित ठेवाची.
प्रिवेडिंग प्रथा बंद करणे,फोटोग्राफी अल्प प्रमाणात करणे. हे ठराव करण्यात आले.