बेधडक मी मराठी न्यूज
विखरण-नंदुरबार तालुक्यातील श्री. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयाने नवो उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अभियान अंतर्गत विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी राज्य पातळीवर तज्ञ मार्गदर्शकाच्या अनुभवातून जिल्हा व नंदुरबार तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी शासनाच्या आदेशान्वये लवकरच अक्षारांची परीक्षा घेण्याचे प्रयोजन आहे. तसेच विखरण गावात असाक्षरांचे वर्ग डी.डी.साळुंके यांच्या मार्गदर्शनाद्वारे स्वयंसेवकांना मदत करून विखरण गावातील बस स्थानक परिसरात, सार्वजनिक सभागृहात असाक्षरांना साक्षर करण्यासाठी वर्ग सुरू केल्यामुळे गावात समाधान व्यक्त करण्यात आले आहे.