बेधडक मी मराठी न्यूज
विखरण :– श्री. आप्पासो.आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण या विद्यालयात शाळेने विद्यार्थ्यांना बचतीतून आर्थिक ज्ञान व्हावे.त्यांना मिळालेले खाऊचे पैसे अथवा स्व कष्टाने पैसे यातून त्यांना आर्थिक व्यवहारातून ज्ञान प्राप्त व्हावे. बचतीच्या माध्यमातून पैसे योग्य वेळी उपयोगात येऊ शकतात.यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांच्या कल्पकतेतून देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी “शाळा बँक” तयार करण्यात आली.यातून विद्यार्थ्यांना आर्थिक ज्ञान व्हावे व त्या व्यवहारातून त्यांना आयत्यावेळी पैसे उपयोगात येण्यासाठी “शाळा बँक” संकल्पना विद्यालयात साकार झाली.याचा संपूर्ण आर्थिक व्यवहार प्रत्येक वर्गातील वर्ग शिक्षकांकडे असून विद्यार्थ्यांना बचत खाते बुक, तसेच प्रत्येक बचत केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी विद्यार्थ्यांकडेच आहेत.या माध्यमातून वेळेवर येणारा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा खर्च, मुलांसाठी एस.टी. बस मासिक पाससाठी पैसे, तसेच वार्षिक निवासी सहलीसाठी पैसे विद्यार्थी शाळा बँकेत जमा करून आर्थिक व्यवहार करतात.यातून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान झाले असून बचतीच्या माध्यमातून त्यांना पैशांचे विनीयोग कसा करावा ? हे शाळा बँक निर्मितीतून स्वतः विद्यार्थ्यांना कळाले.शाळा स्तरावर बँक निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच बचत व येणारा खर्च आपण कसा करावा.याचे ज्ञान झाले,शाळा बँक निर्मितीसाठी विद्यालयातील वर्ग शिक्षक,डी.बी. भारती,एम.डी. नेरकर सी.व्ही.नांद्रे, वाय.डी.बागुल, एस.एच.गायकवाड, ए.एस.बेडसे, एम.एस.मराठे व्ही.बी.अहीरे यांच्या सहाय्याने “शाळा बँक” उपक्रम सुरू झाला.