बेधडक मी मराठी न्यूज, शहादा
शहादा : शहादा पोलीस ठाणे, नंदुरबार जिल्ह्यातील अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानात अत्युत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पूज्यसाने गुरुजी महाविद्यालय व शहादा पोलीस ठाणे यांचा अमली पदार्थ विरोधी जन जागृती पोस्टर स्पर्धेत, कुमारी पायल गणेश राजपूत, पूज्य साने गुरुजी महाविद्यालय शहादा (TYBSC) विद्यार्थिनीने स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला.
शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले गेले असून, पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील पूज्य साने गुरुजी महाविद्यालय व शहादा पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पदाधिकारी व स्थानिक प्रशासनाच्या योजनेतून सादर झालेल्या या पोस्टर स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी विविध रंगीत, प्रभावी आणि विचारपूर्ण पोस्टर्स माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला. यात उत्कृष्ट, रचनात्मक आणि लोकांना खरोखरच प्रभावीपणे विचार करायला लावणारे पोस्टर सादर करून पहिली बाजी मारली.
अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमेमुळे अमली पदार्थांचे सेवन कमी करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांवर मोठा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी अभियानात सहभाग घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांना या प्रकारचे सन्मान सामाजिक बांधिलकी वाढवण्याचाच भाग असल्याचे सांगण्यात येते. त्यांचे सार्थक योगदान अमली पदार्थांच्या विरोधात लढा अधिक बळकट करण्यासाठी प्रेरणा ठरते.