विद्यालयात प्रबोधनातून साक्षरता जनजागृती
शहादा : तळोदा तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद राणे होते. भाषणात उपशिक्षक संजय पाटील यांनी
विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले .अध्यक्षीय भाषणात विनोद राणे यांनी विद्यार्थ्यांनी “शिक्षण हाच खरा विकासाचा मूलमंत्र” या विषयावर प्रभावी पणे मार्गदर्शन केले. तसेच उपशिक्षक मंगल पावरा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “साक्षर समाजच सक्षम राष्ट्राची पायाभरणी करू शकतो. शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.”भाषणात दहावीचे विद्यार्थी आशिष नाईक, संजना नाईक, बादल नाईक,आदी विद्यार्थ्यांनी साक्षरता विषयी माहिती दिली, सूत्रसंचालन अनिल भामरे आभार मंगल पावरा यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, विनोद राणे ,मंगल पावरा, चंदू पाडवी ,फिरोज अली सय्यद , सुवर्णा कोळी , विजय पवार ,सागर पाडवी, आदींनी परिश्रम घेतले.