बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी -हेमंत मराठे मो.9689840855
तळोदा : आमदार राजेश पाडवी व कै.कलावती पाडवी फाउंडेशन यांच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्त तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या शिबिरामध्ये नाशिक येथील एस. आर. व्ही. हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांवरील तपासण्या व मार्गदर्शन केले.
डॉ. प्रसाद अंधारे (कार्डिओलॉजिस्ट) – हृदयविकार, रक्तदाब, डायबेटिस, थायरॉईड व इतर विकारांबाबत सल्ला दिला.
डॉ. वरून नामपल्ली (ऑर्थोपेडिक तज्ञ) – सांधेदुखी, फ्रॅक्चर, कंबरदुखी, स्नायूदुखी तसेच हाडांचे कॅन्सर यावर उपचार व मार्गदर्शन केले.
डॉ. विशाल बोथरा (गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट) – लिव्हरविकार, मद्यपानाचे आजार, अॅसिडिटी, अपचन व पोटाचे कॅन्सर याबाबत तपासणी केली.
आर. एम. ओ. (उपजिल्हा रुग्णालय) – सामान्य आजार जसे की सर्दी, खोकला, ताप व इतर संसर्गजन्य विकारांची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहित वळवी यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिरात शेकडो नागरिकांनी तपासणी करून घेतली व तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन घेतले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथील कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना पाण्याची सोय व्हावी म्हणून आमदार राजेश पाडवी यांनी वॉटर कुलर चे लोकार्पण केले
यावेळी डॉशशिकांत वाणी प्रदेश सदस्य भाजपा बळीराम पाडवी महामंत्री कैलास चौधरी महामंत्री निलेश माळी जिल्हाध्यक्ष भाजपा, अजय भैय्या परदेशी दरबार पाडवी दारासिंग पाडवी नारायण ठाकरे गौरव वाणी शहराध्यक्ष भाजपा जितेंद्र सूर्यवंशी शाम राजपूत विलास डांमरे अनिल परदेशी अंबालाल साठे प्रविण राजपूत, सुभाष जैन, योगेश मराठे, शानू वळवी , नीलाबेन मेहता , अनिता कलाल, संजय वाणी , कल्पेश पाटील ईश्वर पाडवी , योगेश भाऊ , चेतन शर्मा , गुलाब जोहरी, अमन जोहरी निलेश वळवी, चिंगा पाडवी, कृष्णा पाडवी, अरुण बागले, राजु प्रधान, योगेश पाडवी , किरण सूर्यवंशी दीपक जयस्वाल चेतन शर्मा प्रफुल माळी प्रकाश शर्मा सूत्रसंचालन प्रतिक यांनी केले.