बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे मो.9689840855
तळोदा : तालुक्यातील प्रतापपुर येथे दि.30/09/2025रोजी दुर्गामाता दौड समाप्ती झाल्यानंतर आई सप्तशृंगी मातेच्या गडावर कावड कलश पदयात्रासाठी हजारोच्या संख्येने प्रताप्पुर येथून भाविक सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी चालत जात असतात .हि परंपरा मागील 7 ते 8 वर्षा पासून सुरुवात झाली आहे. कावड पदयात्रेचे कलश पूजन ग्रामपंचायत सदस्य तनुजा संजय मराठे यांनी पूजन करून पदयात्रेला शुभेच्छा दिल्या.
नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या श्री दुर्गामाता दौडला प्रतापपूर गावात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भल्या पहाटे निघणाऱ्या या दौडमध्ये बालगोपाल, महिलांसोबत युवक, पुरुष विशेषतः युवती मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. शिस्तबद्ध पण तितक्याच भक्तिमय वातावरणात निघणारी श्री दुर्गामाता दौड गावासीयांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रतापपुर गावातील श्री शिवप्रतिष्ठान
हिंदुस्थान ( तळोदा विभाग ) व हिंदुराष्ट्र सेना तर्फे दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते. यंदा देखील घटस्थापनेपासून दौडला सुरुवात झाली. गावातील विविध भागातून दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. दररोज भल्या पहाटे भगव्या ध्वजाचे पूजन करुन ध्येयमंत्र प्रेरणामंत्र घेवून तसेच ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ , वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय, असा विविध घोषणेने श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ होत आहे. तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे दररोज दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात
येते. माता जगदंबेचा, भवानी मातेचा जय जयकार करून श्री शिवसूर्यहृदय श्लोक, देवधर्माची गीते गात नागरीक दौडमध्ये सहभागी होत आहेत, दौडमध्ये अग्रभागी भगवा ध्वज हातात घेत बालिका लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्यासोबत पांढरे वस्त्र, पांढरी टोपी, भगवा ध्वज हातात घेऊन ‘जय श्रीराम, जय माता दी’ अशा घोषणा देत सहभागी भक्तिमय वातावरण निर्माण करीत आहेत. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व रांगोळी करीत दौडचे स्वागत करण्यात येत आहे.
पहाटेपासूनच लगबग
दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होण्यासाठी बालगोपाल, तरूण-तरुणी, महिला व पुरुष भल्या पहाटे उठून तयारीला लागत आहेत. दौडमध्ये भगव्या ध्वजाचे पूजन, हिंदुत्वाची जाणीव जागृती, गगनभेदी घोषणा, भारत मातेच्या जयजयकाराने वातावरणात राष्ट्रप्रेमाची फुंकर घालत आहे. त्यामुळे दररोज निघणारी दुर्गामाता दौड गावासीयांनी लक्ष वेधून घेत आहे.