सहयोग सोशल ग्रुपतर्फे सफाई कामगारांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप!

बेधडक मी मराठी न्यूज

तळोदा प्रतिनिधी -हेमंत मराठे मो.9689840855

तळोदा:  येथिल सहयोग सोशल ग्रुपच्यावतीने दीपावलीच्या पावन पर्वावर सफाई कामगारांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.सहयोग सोशलग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

तळोदा येथील जुनी नगरपालिकेच्या प्रांगणात सहयोग सोशल ग्रुपतर्फे दिवाळीच्या पावन पर्वावर शहरात सफाई काम करून शहर स्वच्छ ठेवणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगारांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे होते.यावेळी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड.अल्पेश जैन, उपाध्यक्ष डॉ.योगेश बडगुजर,ॲड.किशोर चव्हाण, अशोक सूर्यवंशी,पंडित भामरे, राजाराम राणे,शरद सूर्यवंशी, महेंद्र सूर्यवंशी,चेतन शर्मा,रमेश कुमार भाट,चेतन धनका, वनपाल गिरधर पावरा,चंद्रकांत माळी,रोहित साळुंखे,नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळी, गुलाबसिंग पावरा,अनिल पाडवी, नाईक हवालदार, महिला हवालदार कल्पना पाटील नितीन पाटील,रोहित सावळे,दिनकर तडवी,राजू जगताप,अर्जुन साळवे,जायदा वळवी,अजय गोजरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद सूर्यवंशी यांनी केले. प्रास्तविकातून त्यांनी सहयोग सोशल ग्रुपच्या सेवाभावी व समाजातील सर्वसामान्य घटकांमध्ये दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याची एक परंपरा आदर्शपणे राबवली जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ऍडअल्पेश जैन,डॉ. योगेश बडगुजर, किशोर चव्हाण यांनी केले.या कार्यक्रमाची भूमिका विषद करतांना त्यांनी सांगितले की, दीपावलीचे शुभ पर्व आजपासून सुरू होत आहे, या पावन पर्वावर शहरात सफाईचे काम करून आपले शहर स्वच्छ ठेवणारे सफाई कामगारांना आपण विसरू नये. दिवाळीच्या आनंदात त्यांना फराळी चिवडा व मिठाई पॅकेट वाटप करून त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे त्यामुळे त्यांच्याही आनंदात भर पडेल असे सांगितले.

 “पोलीस अधिकारी कर्मचारी यांनाही दिवाळी फराळ वाटप”

दिवाळीच्या अनुषंगाने रात्रंदिवस कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी तसेच जनतेच्या सुरक्षततेसाठी झटणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याही सेवेच्या सन्मान करण्यात आला.यावेळी सहयोग सोशलग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना दिवाळी फराळ पॅकेट वाटप केले.सहयोग सोशल ग्रुपच्या या सेवा कार्याबद्दल सफाई कामगार कर्मचारी व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांतर्फे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार ॲड अल्पेश जैन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *