शिंदखेडा शहर भाजपा आयोजित सहविचार सभा मोठया उत्साहात संपन्न : इच्छुकांनी केली गर्दी

धुळे:-  जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत बिगुल वाजला असून जिल्ह्यातील पहिली सहविचार सभा घेण्यात आली.शिंदखेडा शहर भाजपा आयोजित सहविचार सभा मोठया उत्साहात संपन्न झाली.येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी शिंदखेडा शहराच्या वतीने आज बिजासनी मंगल कार्यालय शिंदखेडा येथे सहविचार सभा महाराष्ट्र राज्य पणन व राजशिष्टाचार कॅबिनेट मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिंदखेडा शहर भाजपा प्रभारी धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र ऊर्फ रामदादा भदाणे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर धुळे (ग्रामीण) जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाणे, शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डी. एस. गिरासे, भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन,मनोहर पाटील, दीपक दादा देसले, जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आर. के. माळी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सरचिटणीस गिरासे यांनी मुलाखतीकरिता इच्छुक असलेले नगरसेवक आणि पदाधिकारी यांना पक्षाचे नियम पक्षाची घटना आणि बूथ रचना यावर मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात राम दादा भदाणे यांनी पक्षाने जो कोणी उमेदवार दिला त्याचे एक दिलाने काम करून पक्षाचा झेंडा नगरपंचायत वर फडकावा आणि पक्षाची एकजूट दाखवून द्यावे असे आवाहन केले. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष- बापूसाहेब खलाणे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटलं की पक्षाने निवडणुकीला सामोरे जातांना मनात कोणताही किंतू परंतु न ठेवता येणारा काळ हा आपलाच काळ आहे आणि आपण जनसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे या जनसेवेकरिता ज्या कोणाला पक्षाची उमेदवारी मिळेल त्याच्यामागे प्रामाणिकपणे कार्यरत राहून पक्षाला विजयी करावे. त्याचबरोबर जो कोणी विरोधी पक्षातील कार्यकर्ता पदाधिकारी जेष्ठ कार्यकर्ते आपल्या पक्षात अर्थातच भारतीय जनता पक्षात येण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यावा असेही आवाहन यावेळेस बापूसाहेब खलाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा चिटणीस प्रवीण माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजयकुमार महाजन शहराध्यक्ष भाजपा यांनी केले.

नगराध्यक्ष पदासाठी यांनी दिल्या मुलाखती

माजी नगराध्यक्ष रजनी अनिल वानखेडे, मीरा मनोहर पाटील, सुरेखा सुरेखा रविंद्र देसले, रजुबाई सुभाष माळी, उषाबाई प्रकाश चौधरी आदीसह

५५ ते ६० भावी उमेदवारानी मुलाखती दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *