सोयाबीन पिकाला मिळत आहे बाजारात कवडीमोल किंमत.

बेधडक मी मराठी न्यूज

तळोदा तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855

 

तळोदा: – तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी वर्गाची आता पीक काढण्याच्या कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. सध्या जास्त प्रमाणात सोयाबीन या पिकाची काढनी हार्वेस्टर द्वारा करण्यात येत आहे.अवकाळी पावसामुळे सोयाबीन या पिकांचे दरडोई उत्पन्न हे कमी झाले असून पिकाची गुणवत्ता देखील खूप प्रमाणात घटली आहे. या पिकांचे उत्पन्न एकरी दहा ते बारा क्विंटल येत असते व बाजार भाव देखील 4500 हजार रु ते 5000 हजार रुपये असा मागील वर्षी होता. परंतु यावर्षी सोयाबीन या पिकांचे उत्पन्न हे एकरी फक्त एक ते दोन क्विंटल असे निघत आहे व त्याच्यात देखील बारीक प्रमाणात व काळपट असा रंग झाला आहे.अवकाळी पावसामुळे अशी परिसथिती उद्भवली आहे.आणि विक्री करण्यास घेऊन गेले असता सोयाबीनला फक्त 2700रू ते 3000 रू पर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली आहे.सोयाबीन या पिकाला एकरी खर्च हा 15 ते 17 हजार रुपये येत असतो. मात्र उत्पन्न हे फक्त 5400 रू एकर कमी इतकेच आले आहे त्यामुळे या पिकांच्या खर्च देखील पूर्ण झाला नसून शेतकरी हवा दिल झाला आहे बँकेतून जे कृषी कर्ज घेतले आहे ते कशाप्रकारे परतफेड करता येईल याची चिंता शेतकऱ्यांना सतत असून शासनाकडून काही मदत मिळते का याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *